लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीला घेऊन रामगोपाल गुप्ता यांनी १ आॅगस्टपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज (दि.३) तीसºया दिवशी ही त्यांचे उपोषण सुरुच होते.ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे २६ मंजूर पदांपैकी केवळ १५ पदे भरलेली आहे. तर ११ पदे रिक्त आहे. रिक्त असलेल्या ११ पदापैकी ३ वैद्यकीय अधिकारी व १ एन.एम. पदे मंजूर आहेत. मागील वर्षभरापासून ३ वैद्यकीय अधिकाºयांची आणि २०१४ पासून एन.एमचे पद रिक्त आहे. दोन वर्षांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद १, प्रयोगशाळा सहाय्यक १ पद, १ पद अधिपरिचारिका, १ पद एक्सरे तंत्रज्ञ, वाहन चालक, २ स्विपर असे एकूण ११ पदे रिक्त आहे. सडक-अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयातील १५ पदे भरलेली आहेत. तर एक वर्षापासून ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाही. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयाचा तालुक्यातील नागरिकांना कुठलाही उपयोग होत नाही. प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. पंचमय्ये हे सुध्दा रजेवर गेले आहेत. ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. याच सर्व गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी गुप्ता यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. पातुरकर यांनी आज (दि.३) सडक अर्जुनी येथे भेट देऊन गुप्ता यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान पातुरकर यांनी सहसंचालक यांच्याकडे यासंबंधी पाठपुरावा केला आहे. एक दोन दिवसात डॉक्टराची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात केली जाईल असे आश्वासन दिले. मात्र यावर गुप्ता यांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्यांचे आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुप्ता यांच्या आमरण उपोषणाचा आज (दि.३) तिसरा दिवस आहे.
गुप्ता यांचे आमरण उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:48 IST
तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
गुप्ता यांचे आमरण उपोषण सुरूच
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ करभार : डॉ. पातुरकर यांची उपोषणकर्त्याशी चर्चा