शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, उमेदवारांची प्रचारासाठी धावपळ

By कपिल केकत | Updated: November 2, 2023 19:56 IST

रविवारी (दि.५) मतदान होणार असल्याने नियमानुसार शुक्रवारी (दि.३) प्रचाराला विराम लागणार आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर तीन ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारांनी प्रचारातून चांगलाच जोर लावण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये चांगलाच ज्वर वाढला आहे. रविवारी (दि.५) मतदान होणार असल्याने नियमानुसार शुक्रवारी (दि.३) प्रचाराला विराम लागणार आहे.

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र पोटनिवडणूक होत असलेल्या चार जागांसाठी फक्त प्रत्येकी एकच अर्ज आला आहे. तर तीन जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. परिणामी चार जागांची निवडणूक अविरोध झाली असून तीन जागांसाठी परत एकदा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. यानंतर आता जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार असून फक्त तीनच जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे.

रविवारी (दि.५) मतदान होणार असल्याने उमेदवारांनी जोमात प्रचाराला सुरुवात केली आहे. गावातील एक-एक घर हुृडकून उमेदवार त्यांच्या घरापर्यंत जाऊन भेट घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये तर थंडीतही निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. अशात नियमानुसार, शुक्रवारी (दि.३) प्रचाराला विराम लागणार असल्याने उमेदवारांनी प्रचारावर आणखी जोर लावला आहे.

४९६० मतदार बजावणार मतदानाच हक्कया निवडणुकीत ४,९६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातही काही गावांमध्ये महिलांची संख्या असल्याने तेथील उमेदवारांचे नशिब महिलांच्या हाती आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, सर्वाधिक चुरस अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंड-देवलगाव येथे दिसत आहे. कारण, तेथे सर्वाधिक ९ सदस्य व सरपंचांच्या जागेसाठी सार्वत्रिक निवडणूक घेतली जात असून सर्वाधिक ११७४ मतदार तेथेच आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक