लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: तिरोडा पोलिसांची कारवाईगोंदिया : मुंडीकोटा येथे राहणाऱ्या गुंगा ऊर्फ नरेश ताराचंद शर्मा (३०, रा. देव्हाडी ता. तुमसर) याच्या खून प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला बिरसी येथे शनिवारी दुपारी ४.२० वाजतादरम्यान अटक केली आहे. विजय ऊर्फ छोटेलाल ताराचंद कनोजे (२३, रा. बिरसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.खून करून मुंडीकोटा येथील विनोद भांडारकर यांच्या शेतातील विहीरीत त्याचा मृतदेह टाकला. तो खून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आला. सदर खून लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप असलेल्या महिलेने व तिच्या अन्य साथीदारांनी केला. या प्रकरणातील फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीला बिरसी येथे शनिवारच्या दुपारी ४.२० वाजता दरम्यान अटक करण्यात आली. विजय ऊर्फ छोटेलाल ताराचंद कनोजे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.रेल्वे गाड्यांमध्ये लाडू विकण्याचे काम करणारी विधवा आशा मोरेश्वर राजुके (५०, रा. खात) ही मागील काही वर्षापासून मुंडीकोटा येथे राहते. याच रेल्वेत खाद्य पदार्थ विकणाऱ्या गुंगा शर्मा याचे त्या महिलेसोबत सूत जुळले व ते एकत्र राहू लागले. काही दिवसानंतर त्यांच्या सोबत अजय व विजय ऊर्फ छोटेलाल ताराचंद कनोजे राहण्यासाठी आले. अजय व विजय हे घरफोड्या व चोरी करण्यात पटाईत असल्याने चोऱ्या करून आणलेल्या पैशांतून त्यांचा हिस्सावाटा व्हायचा. अशाच एका वाटणीत गुंगाला कमी पैसे देण्यात आल्याने अजय व विजय सोबत त्याचे खटकले. एकाच घरात ते तिघेही आशा सोबत राहत असल्याने आशाचे अजय व विजयशी तिचे अनैतिक संबध असल्याचा संशयही गुंगा घेत होता. यामुळे गुंगाचा काटा काढण्याचा चंग आशा, अजय व विजयच्या साथिदाराने बांधला. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गुंगाला दारू पाजून गुप्ती आणि कुऱ्हाडीने मारून गुंगाचा खून करण्यात आला. गुंगाच्या खून प्रकरणात मुंडीकोटा येथील राजू कांताराम बावने (२८) व आशा मोरेश्वर राजुके (५०) या दोघांना अटक करण्यात आली होती. परंतु अजय व विजय फरार होते. यातील विजयला तिरोडाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी त्याच्या गावी बिरसी येथे शनिवारी दुपारी अटक केली. (तालुका प्रतिनिधी)
गुंगा शर्मा खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक
By admin | Updated: October 19, 2015 02:07 IST