शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोषींना माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:13 IST

एखाद्या खासगी रूग्णालयापेक्षा शासनाचा जास्त पैसा येथील बाई गंगाबाई रूग्णालयावर खर्च होत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : बीजीडब्ल्यू रूग्णालयाची आकस्मिक पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एखाद्या खासगी रूग्णालयापेक्षा शासनाचा जास्त पैसा येथील बाई गंगाबाई रूग्णालयावर खर्च होत आहे. मात्र सोयी सुविधांच्या नावावर हे रूग्णालय शासनाच्या नावावर डाग लावण्याचे काम करीत आहे. येथील डॉक्टर्स भ्रष्टाचारात एक दुसºयांशी स्पर्धा करतात. मात्र कामाच्या वेळेस मागे राहातात. जोपर्यंत हे डॉक्टर्स याला आपले वैयक्तिक काम समजणार नाही, तोपर्यंत रूग्णालय व्यवस्थित चालणे शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी हे आपले रूग्णालय समजून काम करावे, अन्यथा कोणत्याही अप्रिय घटनेत दोषीला माफी दिली जाणार नसल्याचा इशारा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.‘लोकमत’ने पंधरा दिवसांपूर्वी या रुग्णालयातील अनागोंदी कारभाराची मालिका चालवून येथील अवस्थेचा पाढा वाचला होता. त्याचीच दखल घेत आमदार अग्रवाल यांनी सोमवारी (दि.११) रूग्णालयाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या भेटीत आमदार अग्रवाल यांनी, रूग्णालयातील रूग्णांना दिली जाणारी औषधांची व्यवस्था, मागील वर्षभरापासून बंद पडून असलेली एक्स-रे मशीन, निकृष्ट भोजन, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, अनुपयोगी कर्मचारी, पार्कींग व्यवस्था, बंद पंखे, वीज व्यवस्था, अस्तव्यस्त प्रयोगशाळा, पसरलेली घाण आदिंची पाहणी केली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी २०० खाटांचे हे रूग्णालय असताना केवळ १३५ खाटा असल्याचे बघून उर्वरीत ६५ खाटा उपलब्ध करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले. रूग्णालयात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करीत त्याला गती देण्याचे निर्देश दिले. तर नवीन इमारतीतील परीक्षा सभागृहात ५० खाटांची व्यवस्था डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण केली जाणार. यासह तिसºया माळ््यासाठी लिफ्टची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रूखमोडे, शल्यचिकीत्सक डॉ. पातूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, बीजीडब्ल्यू रूग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. संजीव दोडके, डॉ. सुवर्णा हुबेकर, रक्तपेढी व्यपस्थापक डॉ. कावळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. मनिंद्र जुनेजा, सोनोग्राफी विशेषज्ञ डॉ. गौरव बग्गा, कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगर परिषद पक्षनेता शकील मंसूरी, नगरसेवक सुनील तिवारी, भागवत मेश्राम, देवा रुसे, शहर महासचिव अपूर्व अग्रवाल, अ‍ॅड.योगेश अग्रवाल, अजय गौर, सुशील रहांगडाले, जहीर अहमद, देवेंद्र अग्रवाल, यशपाल डोंगरे, अंकीत जैन, मेहबूब अली, दिल्लू गुप्ता यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस कार्यकर्ता व रूगणालयातील अधिकारी उपस्थित होते.विभागीय उपव्यवस्थापकांना दिली माहितीया भेटी दरम्यान रूग्णालयातील अव्यवस्था पाहून आमदार अग्रवाल यांनी रूग्णालयातूनच थेट नागपूर विभागीय उपव्यवस्थापक डॉ. जयस्वाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. याप्रसंगी त्यांनी डॉ.जयस्वाल यांच्याकडे रूग्णालयातील परिस्थिती मांडत हा प्रकार गांभीर्याने घेत त्वरीत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.