गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल इन्स्टीट्यूट आॅफ फार्मसी बी.फार्म येथे प्राचार्य डॉ. नितीन इंदुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी तसेच प्रत्यक्ष मुलाखतींची पूर्व तयारी कसी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. औषध निर्माण शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी पदवी झाल्यानंतर ते कोणत्याही क्षेत्रात आपले करीअर बनवू शकतात. त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करायचे असल्यास त्यांनी स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी कशी करायची यावर व्याख्याण दिले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतींची तयारी कशी करायला पाहिजे व स्वत:ला कसे तयार करायला पाहिजे यावर माहिती दिली. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला समोर ठेवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, नेट सर्फिंग, जनरल नॉलेज, बुक्स आणि स्वत:च्या क्षेत्राचा संपूर्ण ज्ञान असायला पाहिजे, असे श़ेंडे म्हणाले. संचालन अजय डोंगरवार यांनी आभार प्रा.जहिरा खान यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
फार्मसीत स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीवर मार्गदर्शन
By admin | Updated: November 9, 2016 01:49 IST