शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात वाढतेय गर्दी

By admin | Updated: July 27, 2014 23:50 IST

या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात

गोंदिया : या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांनी उपचारासाठी गर्दी केली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंंतातुर झाले आहेत. पाऊसच नसल्याने वातावरण दूषित झाले आहे. ही स्थिती अनेक रोगांच्या आगमनाला कारणीभूत ठरल्याची कबुली वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सध्या अतिसाराची लागण सुरु झाली आहे. अतिसाराने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हैराण केले आहे. खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडूंब भरली आहेत. गरीब व सामान्य कुटुंबातील नागरिक मात्र पैशाअभावी केटीएस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. जिल्हाभरातून केटीएसमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. पावसाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास अतिसारानंतर कावीळ, टायफाईड आदी साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता एका डॉक्टराने वर्तविली. गोंदियात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यावरील माश्यांचे घोंघावणेही नित्याचे झाले आहे. दूषित पाणी पिण्यात येत असल्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असल्याची कबुली एका डॉक्टराने दिली. शहरातील बहुतांश भागातील नाल्या तुडूंब भरल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. सांडपाणी साचून राहात असल्याचे चित्र बऱ्याच वार्डात कायम आहे. नेहरू चौकात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी साचून आहे. दररोज नागरिक पाणी तुडवत रस्ता ओलांडून जात आहेत. वातावरणात आलेला असमतोलपणा तसेच दूषित पदार्थांचे सेवन यामुळे अतिसार, डायरिया, फ्लू, मलेरिया, कॉलरा, टायफाईड, कावीळ आदी आजार बळावत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या बघता साथीच्या रोगांनी पाय पसरविले असल्याचे चित्र स्पष्ट होते. बहुतांश वॉर्डात बेडव्यतिरिक्त जमिनीवरसुद्धा रुग्णांवर औषधोपचार केला जात आहे. गत आठवड्यापासून केटीएसमध्ये औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी साथीपासून वाचण्यासाठी स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे, शिळे अन्न खाऊ नये व वेळीच औषधोपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)