शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

खुर्चीसाठी गटागटांचे वर्चस्व

By admin | Updated: July 21, 2015 01:22 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये हार-जीत झाल्यानंतर आता समस्त तालुक्याचे लक्ष वेधले ते २ आॅगस्टला

आमगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये हार-जीत झाल्यानंतर आता समस्त तालुक्याचे लक्ष वेधले ते २ आॅगस्टला होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाकरिता होणाऱ्या निवडणुकीने. यात कोण कोणत्या पक्षाचा हा विचार न करता केवळ खुर्चीसाठी गटागटांतून उभे राहून वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता अनेकांनी दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. यामुळे खुर्ची प्राप्तीसाठी कोण कोणावर मात करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २ आॅगस्टला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाकरिता निवडणूक होत आहे. यात सेवा सहकारी सर्वसाधारण गटामधून बन्सीधर अग्रवाल, सुभाष आकरे, सतीश आकांत, दिलीप गिरी गोसावी, संजय नागपुरे, निखिल पशिने, राजेश भक्तवर्ती, भोलागीर भृगलास्तप, केशवराव मानकर, रामनिरंजन मिश्रा, जोत्सना मेश्राम, टिकाराम मेंढे, ताराचंद मेंढे, तुळशीराम मेंढे, विजय शर्मा, महिला गटातून चिंतन तुरकर, माया रहांगडाले, शांता राखडे, विमुक्त व भटक्या जमाती गटातून विनोद कन्नमवार, श्रीकृष्ण चंदिवाले इतर मागासवर्गीय गटातून युवराज बिसेन, तेजराम रहांगडाले, ग्रामपंचायत गटातून अनुसूचित जातीमधून ज्योती भालेकर, रामेश्वर शामकुवर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किशोर बोलने, गजानन भांडारकर, ग्रामपंचायत सर्वसाधारण रविदत्त अग्रवाल, विजयकुमार मुनेश्वर, उमेंद्र रहांगडाले, चुन्नीलाल शहारे, व्यापारी व आडतिया गटातून जगदिशप्रसाद अग्रवाल, धर्मेद्र अग्रवाल, सावलराम अग्रवाल, ब्रजेश असाटी, गोकुल फाफट, हमाल गटातून राजेश डोंगरवार, दादुराम नागपुरे, विपनन व प्रक्रिया गटातून हुकूमचंद बहेकार, विकास महारवाडे अशा ४० उमेदवारांनी १९ जागांसाठी आपले भवितव्य पणाला लावले आहे. मलाईचे पद मिळणार याकरिता मोठ्या प्रमाणात पैशाची गंगा वाहात जाणार हे निश्चित. त्यामुळे व्यक्तिगत व पक्षाकडून पैसा येणार व त्याची उधळण संचालक करतील. मात्र मागील पाच वर्षात काय झाले, क्रियाशील की निष्क्रिय याची ओळख करूनच मतदार मतदान करतील, अशी चर्चा समस्त तालुक्यात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)बीएसएनएलची सेवा अनियमितआमगाव : दुरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून कार्य करणाऱ्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेला विविध प्लॅनमुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ही सेवा व्यवस्थित व नियमित मिळत नाही. काँग्रेसमध्ये फाटाफूटयात काँग्रेस व भाजपाची युती आहे. परंतु मजेदार गंमत अशी की, काँग्रेसचा एक गट राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करून सत्ता हस्तांतरीत करण्याकरिता लागला आहे. जो तो संचालकाच्या खुर्चीसाठी सुखद स्वप्न पाहत आहे. संचालक म्हटल्यानंतर मलाईदार उर्फ धनिरामाची कृपादृष्टी या उद्देशाने सर्व नियम व पक्ष बाजूला ठेऊन ४० उमेदवार या महासंग्रामात उभे आहेत. जवळपास सर्व गटातून एकूण मतदार चौदाशे ते पंधराशे आहेत. गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात राष्ट्रवादी व काँग्रेस यांची सत्ता होती.