शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

तालुक्यात महादुष्काळ पडला असूनसुद्धा शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीतही आदिवासी समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.

ठळक मुद्देनाना पटोले : आदिवासी समाजातील २७ जोडपी परिणयबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यात महादुष्काळ पडला असूनसुद्धा शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीतही आदिवासी समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अशा सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील लोक एकत्र होतात. अशा सोहळ्यांमुळे लोकांची आर्थिक बचत, वेळेची बचत व एकत्रीकरण होते. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून असे सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.ते आदिवासी हलबा-हलबी समाज सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.१५) आदिवासी समाजाच्या २७ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा क्रांतीवीर बिरसा शक्ती मैदानात पार पडला. या वेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. रामरतन राऊत, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, डॉ. नामदेवराव किरसान, सालेकसाचे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, माजी समाजकल्याण सभापती देवराज वडगये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, नगरसेवक यादोराव पंचमवार, जि.प. सदस्य उषा शहारे आणि बी.टी. राऊत यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, युवक वर्ग व वºहाडी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.या विवाह सोहळ्यात लग्न करणाºया आदिवासी समाजाच्या २७ वर-वधू जोडप्यांचा विवाह समिती तथा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू व भावी वैवाहिक सुखी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान आ. संजय पुराम, माजी आ . रामरतन राऊत, डॉ. नामदेवराव किरसान, रमेश ताराम, भरतसिंग दुधनाग, उषा शहारे व बी.टी. राऊत आदींनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक आदिवासी समाज सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष हिरालाल भोई यांनी मांडले. संचालन करून आभार सविता उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी आदिवासी समाज सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष हिरालाल भोई, उपाध्यक्ष राधेशाम भोयर, सचिव भोजराज घासले, सहसचिव शंभू राऊत, कोषाध्यक्ष दामोदर गावड, सहकोषाध्यक्ष मानिक भंडारी, संघटक मधू दिहारी, दिलीप राऊत, सोमा ताराम, गणेशराम गावडकर, कविता उईके, आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना तालुका शाखा देवरीचे अध्यक्ष प्रेमलाल पिहदे, उपाध्यक्ष तुकाराम राणे, सचिव मारूती मेळे, संघटक तथा मार्गदर्शक रामचंद्र राऊत, काशिनाथ ईश्वर, शिवलाल गावडकर, महिला समितीच्या सुनिता गावडकर, ललीता राऊत, शोभा घरत, सरिता दिहारी, गीता कुरसुंगे आदिंनी सहकार्य केले.