मुंडीकोटा : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयडीबीआय बँक शाखा मुंडीकोटाच्या वतीने २३ डिसेंबर हा शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापक एस.एम.दहिवले, सह व्यवस्थापक आर.जे.पराते, आर.एम.गजभिये, बी.बी.रामटेके, ए.एम.भावे, योगेश भांडारकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निलेश भारती, कृषी अधिकारी पंचायत समिती चरडे, कृषी मंडळ अधिकारी कुकडे, सरपंच निर्मला भांडारकर, उपसरपंच देवेंद्र मंडपे, ग्राम विकास अधिकारी बी.आर.हटवार, शेतकरी, महिला बचत गटातील महिला व गावकरी उपस्थित होते. संचालन भावे यांनी केले. सुरूवातीला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शाखा व्यवस्थापक दहिवले यांनी शेतकऱ्यांना कर्जा विषयी मार्गदर्शन केले. निलेश भारती यांनी शेतकऱ्यांना व महिला बचत गट यांना मार्गदर्शन केले. चरडे यांनी शेतकऱ्यांना लागणाऱ्या साहित्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ अधिकारी कुकडे यांनी शेतीला लागणाऱ्या गांढूळ खत, सेंद्रीय खते, याबाबत मार्गदर्शन केले. ग्राम विकास अधिकारी बी.आर.हटवार यांनी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत कशी करावी व धानाचे अधिक उत्पादन कसे घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर मुंडीकोटा परिसरातील प्रगतीशील शेतकरी माणीकराव डोंगरे, भूपाल कटरे, हेमंत नागपूरे यांचा सत्कार करण्यात केला. आभार आर.एस.गजभीये यांनी मानले. (वार्ताहर)
गट व कर्जावर मार्गदर्शन
By admin | Updated: December 29, 2016 01:28 IST