गोंदिया : तिरोडा तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातून महाआॅनलाईन आज्ञावलीचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.कार्यक्रमात प्रामुख्याने तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार कोकवार, सेतू लिपीक राठोड, सेतू केंद्राचे कंत्राटदार प्रशिक, सुशिक्षित बेरोजगार सोसायटीचे अध्यक्ष धमेंद्र डोंगरे, सचिव नरेश शहारे, सभासद पंकज धुर्वे, डाटा एन्ट्री आॅपरेटर राजविलास बागडे, प्रमोद बोरकर, आशिष गजभिये, राष्ट्रपाल बडगे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने सेतू केंद्र महाआॅनलाईन आज्ञावलीचा वापर करून आॅनलाईन प्रमाणपत्रे निर्गमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय (मातंस/२०१२/प्र.क्र. १५२/३९, दि. २३ मे २०१२) नुसार महाआॅनलाईन आज्ञावलीचा वापर करून निर्गमित होणाऱ्या प्रमाणपत्रे व दस्तावेजाचे दर निर्धारित केलेले आहे. त्यानुसार कुठलेही प्रकरण सेतू केंद्रात दाखल करताना अनिवार्य हलफनाम्यासह प्रकरण दाखल करावयाचे असल्यास प्रति प्रकरण ५४.९४ रूपये व हलफनाम्याशिवाय प्रकरण दाखल करावयाचे असल्यास प्रति प्रकरण ३२.४७ रूपये दर निश्चित केलेला आहे तसेच निव्वळ हलफनाम्याचे दर प्रति हलफनामा ३२.४७ रूपये असल्याची माहिती देण्यात आली.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी महिरे यांनी जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून सेतू केंद्रात महाआॅनलाईन आज्ञावलीचा वापर केला जाणार आहे. तसेच सेतू केंद्रात अर्ज दाखल करताना कोणतीही कोर्ट फी स्टॅम्प, तिकीट लावू नये. या माहितीची सर्व जनतेने दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
तिरोड्याच्या सेतू केंद्रातून महाआॅनलाईन आज्ञावली
By admin | Updated: November 6, 2014 01:58 IST