शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान साठवणुकीतील घट मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:42 IST

आधारभूत हमीभाव धान खरेदी योजना पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सुरु आहे. सहकारी संस्था धानाची हमी भावानुसार खरेदी करतात. खरेदी केलेला धान उघड्यावर न ठेवता गोदामात सुरक्षीत ठेवण्यात येतो.

ठळक मुद्देरेखलाल टेंभरे : प्रती क्विंटल ८ किलो धानाची घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : आधारभूत हमीभाव धान खरेदी योजना पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सुरु आहे. सहकारी संस्था धानाची हमी भावानुसार खरेदी करतात. खरेदी केलेला धान उघड्यावर न ठेवता गोदामात सुरक्षीत ठेवण्यात येतो. मात्र शासनाकडुन धानाची उचल उशिरा होत असल्याने प्रती क्विंटल ८ किलो धानाची घट येते.त्यामुळे संबंधित संस्थाना याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने धानातील घट मंजुर करण्याची मागणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे सदस्य रेखलाल टेंभरे यांनी केली. टेंभरे म्हणाले सन २००९-१०,२०१०-११ या वर्षात भरडाईसाठी धानाची उचल उशिरा झाल्याने धान ४५ महिन्यापर्यंत गोदामात पडुन होते.त्यामुळे धानात ८ किलो प्रती क्विंटल घट आली. यात वाहतूक, व भरडाई दर वाढवून मिळायला पाहिजे. सीएमआर तांदुळामध्ये ३२ टक्के पर्यत कणीचे प्रमाण वाढवून देण्याची मागणी केली. सन २०११ ते २०१७-१८ या वर्षात १५ महिन्यापर्यंत शासनाने धानाची उचल केली नाही. यात १ टक्के घट केंद्र शासनाने मंजुर केली. मात्र राज्य सरकारने ही घट मंजुर केली नाही.शासनाजवळ सीएमआर तांदूळ ठेवण्यासाठी पुरेशे गोदाम उपलब्ध नाहीत. त्यामुळे भरडाईला उशिरा होत आहेत. ७ वर्षात झालेली घट शासनाने मंजुर करावी. तसेच शासन गोदाम भाडे प्रती क्विंटल २ रु पये ४० पैसे देते ते मात्र भाडे केवळ दोनच महिन्यासाठी दिले जाते. हे शासनाचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप टेंभरे यांनी केला. खरीप हंगाम ६ महिने चालतो व रब्बी हंगाम ३ महिने चालत असल्याने धान खरेदी सुरु राहते. गोदामात धान साठवून असेपर्यत मालकाला गोदाम भाडे मिळाले पाहीजे अशी मागणी टेंभरे यांनी यावेळी केली.पत्रकार परिषदेला अध्यक्ष नामदेव कापगते, सदशिव खेत्रे, भेरिसंग नागपुरे,रेखलाल टेंभरे,घनश्याम खेडीकर, महेन्द्र मने, दामोदर मिसार, रमेश चुऱ्हे, रमेश गौतम उपस्थित होते.