शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या आरोपात ग्रामसेवक निलंबित

By admin | Updated: September 30, 2016 01:49 IST

कट्टीपार येथील ग्रामपंचायतच्या दस्तावेजात अनियमितता व नियमबाह्य कामे केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यामुळे

कालीमाटी : कट्टीपार येथील ग्रामपंचायतच्या दस्तावेजात अनियमितता व नियमबाह्य कामे केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यामुळे ग्रामसेवक डी.के. महाकाळकर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी निलंबित केले.पंचायत समिती आमगावअंतर्गत ग्रामपंचायत कट्टीपार येथे अनेक महिन्यापासून अनागोंदी कारभाराला ऊत आला होता. ‘चोर-चोर मौसेरे भाई’ म्हणून ग्राम पंचायतीत नागरिकांच्या पैशाची जोमात लूट सुरू होती. १६ जून २०१६ रोजी ग्राम पंचायतच्या रेकार्ड व कामांची पाहणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. त्यात निविदा न मागविणे, बांधकाम अंदाजपत्रकाशिवाय खर्च नोंदविणे, शासकीय रकमेचा गैरवापर करणे, पदाचा गैरवापर करणे असे प्रकार आढळून आले. चौकशीअंती ग्रामसेवक महाकाळकर दोषी असल्याचे आढळून आले.ग्रामसेवकपदाचे कार्य नियमबाह्य केल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्यामुळे महाकाळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित करण्यात आले. (वार्ताहर)स्थायी समितीतही स्वागतकट्टीपार ग्रामपंचायतमधील नियमबाह्यकामांचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत यापूर्वी गाजला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्यामुळे गुरूवारी (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.चे गटनेता गंगाधर परशुरामकर, ज्येष्ठ सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.