शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

By admin | Updated: August 17, 2015 01:42 IST

येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये १५ आॅगस्ट रोजी आमसभा पार पडली. यात १५०-१६० नागरिक सहभाग झाले होते.

आमसभा : नागरिकांचा आरोपबाराभाटी : येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये १५ आॅगस्ट रोजी आमसभा पार पडली. यात १५०-१६० नागरिक सहभाग झाले होते. या वेळी नागरिकांनी ग्रामसेवकास मागील सभेचे, कामकाजाचे व ग्रामपंचायतने विकासासाठी केलेल्या कामाचा हिशेब व खर्चाबाबत विचारणा केली. मात्र ग्रामसेवक निश्चित यांनी नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ करून त्यांच्या प्रश्नांची उडवाउडव केली. सदर गावात ग्रामसेवक सात-आठ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या काळात ग्रामपंचायतने अनेक कामे केली. गावाचा विकास व्हावा असे प्रत्येकांना वाटते. परंतु बाराभाटी गावातील समस्या, अडचणी या अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी विचारणा केली, मात्र ग्रामसेवकाने उत्तर दिले नाही.कमी खर्चाचे काम करून जास्त खर्चाचे बिले लावणे, खोटी माहिती देणे, केलेल्या कामाचा आढावा न घेता किंवा मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र न घेता कोणतेही कामे स्वमर्जीने करणे, अशी त्यांची कार्यप्रणाली असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सामान्य फंडातील चार ते पाच लाख रुपये जमा असताना गावाच्या समस्या दूर होत नाही. विकास होत नाही. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे २ लाख ४६ हजार रुपये जमा असताना या फंडाचा गाव विकासाला काहीही लाभ नाही. गावातील विद्युत व्यवस्था बरोबर नाही. रस्त्याची कामे बरोबर नाही. क्रीडांगणाचे काम व्यवस्थित नाही, यामध्येही घोळ असल्याचे बोलले जाते.तसेच रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाही. ४० ते ५० मजुरांचे पैसे काही महिन्यापासून अद्यापही मिळाले नाही. अशा अनेक समस्यांची उत्तरे ग्रामसेवक निश्चित यांनी दिले नाही. त्यामुळे सदर ग्रामसेवकाची तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी बाराभाटीच्या नागरिकांनी आमसभेत मागणी केली. (वार्ताहर)