शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व वांद्यात

By admin | Updated: August 1, 2016 00:02 IST

जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे.

पाच सदस्य : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही एकोडी : जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे. जुलै २०१५ अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर हे सदस्य निवडून आले आहेत. १३ ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक २५ जुलै २०१५ रोजी घेण्यात आली होती. परंतु राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु येथील महादेव तेजराम बिसेन यांनी नायब तहसीलदारांना माहितीचा अधिकारांतर्गत ३१ मे रोजी अर्ज करून राखीव जागेवर निवडून आलेल्या व जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांची यादी मागितली. त्यामुळे विभागाकडून त्यांना ६ जून रोजी मागणीनुसार यादी देण्यात आली. त्यानुसार येथील राखीव जागेतून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये प्रभाग क्र.१ मधून गीता प्रकाश भलावी (अनु. जमाती महिला) व त्याच प्रभागातून माया मयाराम तायवाडे (अनु. जाती महिला), प्रभाग क्र. २ मधून चित्रकला तेसराम वघारे (नामाप्र महिला), प्रभाग क्र. ३ मधील वैशाली विष्णुदयाल बिसेन (नामाप्र महिला) तर प्रभाग क्र. ५ मधून नामदेव मोहन बिसेन (नामाप्र) यांचा समावेश आहे. नियमानुसार, निवडून आलेल्या सदस्यांना सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र या पाच सदस्यांनी विहीत कालावधीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी राज्य निवडणूक आयोगाच्या सक्त निर्देशामुळे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व संकटात आले आहे. तर महादेब बिसेन यांनी अप्पर तहसीलदारांकडे (निवडणूक) या पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याकरिता कलम १० (१ अ) ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत अर्ज केला आहे. (वार्ताहर)