शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी होणार ग्रामस्तरीय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:09 IST

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे सुरु केले आहे. या निवडणुका ‘दिव्यांग सुलभ निवडणुका’ व्हाव्यात असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी २६ ते ३० मार्च दरम्यान ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे६२०० दिव्यांग मतदार : जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे सुरु केले आहे. या निवडणुका ‘दिव्यांग सुलभ निवडणुका’ व्हाव्यात असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी २६ ते ३० मार्च दरम्यान ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.या सभांमध्ये साधनव्यक्ती, शिक्षक, बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाद्वारे दिव्यांग मतदारांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. सोबतच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेत भाग घेणे सोईचे होणार आहे. अंध मतदारांसाठी बे्रल लिपीतील नमुना मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करतांना ईव्हीएम मशीनच्या उजव्या बाजूला उमेदवारांचा अनुक्रमांक १ ब्रेल लिपीत लिहिलेला आहे, याबाबत जागृती करण्यात येणार आहे.अंध मतदारांना मतदानाच्या वेळी आपल्या सोबत सोबती नेता येईल. यासाठी सोबत्यांचे घोषणापत्र भरुन द्यावे लागणार आहे. वाचा दोष व कर्णदोष असलेल्या मतदारांना त्यांना समजेल अशा भाषेत निवडणुकीत मतदान करण्याबाबत माहिती समजावून देण्यात येणार आहे. जे मतदार मतदान केंद्रापर्यंत चालत येवू शकत नाहीत अशा ३ ते ५ मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद यांच्यामार्फत करण्यात येईल.जिल्हयात एकूण ६२०० दिव्यांग मतदार असून या सोई सुविधांचा त्यांना फायदा होणार आहे. दिव्यांग मतदारांची नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. जिल्हयातील सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.