शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शाळांसाठी ग्रामपंचायतींनी निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:54 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजूनपावेतो निधी अभावी शंभर टक्के डिजिटल झाल्या नाहीत.

नारायण जमईवार : तालुक्यातील ग्रामपंचायतींना सूचना बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजूनपावेतो निधी अभावी शंभर टक्के डिजिटल झाल्या नाहीत. अशा शाळांना गावातील ग्रामपंचायतने १४ व्या केंद्रीय वित्त आयोगामधून निधी उपलब्ध करून द्यावा, असा आदेशवजा सूचनापत्र गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी गुरूवारी (दि.१६) काढून सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातून गोंदिया जिल्ह्यातील १०० टक्के शाळा डिजिटल होत आहेत. लोकसहभागातून शाळा डिजिटल करून तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने शिक्षण घेण्याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. गावातील लोकांच्या आर्थिक सहाय्यातून, लोकवर्गणीच्या माध्यमातून डिजिटल शाळा करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र राबविल्या जात आहे. तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी सक्तीचे निर्बंध लावण्याचे वातावरण दिसत आहे. डिजिटल शाळा करण्यासाठी आवश्यक निधी जमविण्यासाठी शिक्षकांना गावात घरोघरी भटकंती करून पैशाची जुळवा-जुळव करावे लागत असल्याचे वास्तव चित्र पहायला मिळत आहे. अशाही परिस्थितीमध्ये तालुक्यातील बहुतांश शाळा लोकाश्रयातून मिळालेल्या आर्थिक मदतीने डिजिटल झाल्या आहेत. आर्थिक मदतीअभावी आजही काही शाळा डिजिटल शाळा होण्यापासून कोसो दूर आहेत.गावपातळीवरच्या प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीवजा विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी-मोरगावच्या शिष्टमंडळाने बुधवार (दि.१५) पं.स. सभापती, गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली होती. सदर मागणीची तत्काळ दखल घेऊन गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी गुरूवारला (दि.१६) काढलेल्या लेखी सूचना पत्रान्वये तालुक्यातील १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतने १४ व्या केंद्रीय वित्त आयोगामधून प्राप्त निधीतून करावयाच्या नियोजनातील आरोग्य, शिक्षण, उपजीविका (मानव विकास) या बाबी अंतर्गत शाळा डिजिटल करण्यासाठी शासन निर्णयाच्या अधिन राहून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे जमईवार यांनी संबंधित ग्रामपंचायतींना १६ फेब्रुवारी काढलेल्या एका पत्रकान्वये कळविले आहे. शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शाळा डिजिटल करण्यासाठी निधीची तरतूद होण्याची चिन्हे दिसत आहे. (वार्ताहर)