अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. वैद्यकीय अंदाजानुसार येथील सरपंच नंदू पाटील गहाणे, ग्राम विस्तार अधिकारी कुंडलिक कुटे यांनी ग्रामपंचायतीची सभा बोलावून गावातील नाल्या आणि रस्ते जंतुनाशक औषधीची फवारणी करून गाव निर्जंतुक करण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी (दि. २४) सकाळपासून गाव निर्जंतुक करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे आणि सामाजिक जाणिवेची दृष्टी असणारे सरपंच म्हणून त्यांची गावात ओळख आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयीची भीती कमी होऊ लागली आहे.
...
‘कोरोना विषाणूचा माजलेला कहर लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी ग्रामपंचायत प्रशासनाने उचलण्याचे उद्देशाने गावात जंतुनाशक औषधीची फवारणी करून संपूर्ण गाव निर्जंतुक करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यानंतर सहभागातून गावात स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.
नंदू पाटील गहाणे, सरपंच, केशोरी