शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:03 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तालुका गोंदियातर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तालुका गोंदियातर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.यात महासंघाचे राज्य सचिव मिलिंद गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, तालुकाध्यक्ष मुन्नालाल ठाकरे, तालुका सचिव राजेंद्र हटेले यांच्या नेतृत्वात राजलक्ष्मी चौकातून मोर्चा काढून पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन बीडीओ यांना देण्यात आले.महासंघाने कर्मचाऱ्यांच्या स्थानिक मागण्यांना घेवून जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर मोर्चा व धरणे आंदोलनाचे आवाहन केले होते. त्या अनुसषंगाने सदर मोर्चा काढण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भत्ता त्वरित अदा करा, नियमाप्रमाणे वेतन भत्याच्या एकूण रक्कमेवर दरमहा ८.३३ टक्के भविष्य निर्वाह निधी जमा करा, वैयक्तिक गट विमा योजना लागू करा, आॅनलाईन वेतन प्रणालीची प्रक्रिया पूर्ण करा, सर्व सेवाशर्तीची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी. अंमलबजावणीे न करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कर वसुली करिता केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवून अनुदानात कपात करणे व नियमाप्रमाणे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याचे टाळणे बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांच्या निवेदनावर कार्यवाही करण्याकरिता ६ एप्रिलला संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन बीडीओ डॉ. पानझाडे यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुखदेव शहारे, सहसचिव मोहन डोंगरे, संगठन सचिव महेंद्र भोयर, महेंद्र कटरे, ताराचंद बावणकर, मुकेश उपराडे, मानिक उके, राजकुमार लिल्हारे, अरविंद दुधबुरे, रवि जमरे, अशोक बिसेन, ओंकार दिहारी, संगीता चौरे इत्यादी कार्यकर्ते व कर्मचारी सहभागी झाले.