शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (दि.११) जाहीर ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक : १५ जानेवारी रोजी मतदान : मतमोजणी १८ रोजी

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (दि.११) जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने गुलाबी थंडीत आता ग्रामीण भागातील राजकारण तापणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतचा ५ वर्षांचा कार्यकाळ दोन महिन्यापूर्वीच पूर्ण झाला. मात्र कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होतेे. तेव्हापासून ग्रामपंचायच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. राजकारणातील प्रवेशाची ग्रामपंचायत ही पहिली पायरी समजली जाते. स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांर्भीयाने पाहतात. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता प्रतीक्षा संपली आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतची निवडणूक घेण्यात येणार आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतीपैकी १८९ ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या कालावधीत या निवडणुका होत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  

सरपंचाची निवड करणार आता सदस्य यापूर्वी सरपंचाची निवड ही थेट जनतेत केली जात होती. मात्र आता निर्णयात बदल करण्यात आला असून सरपंचाची निवड ही निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य करणार आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. निवडणुका होणाऱ्या क्षेत्रात आचारसंहिता लागू राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेल्या तारखेपासून निवडणुका होणाऱ्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही.   

असा आहे निवडणूक कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे  २३ ते ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करणे  ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी ४ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान  १८ जानेवारी रोजी मतमोजणी  २१ जानेवारी रोजी निवडणुकीच्या निकालाची अधि सूचना प्रसिध्द करण्याची शेवटी तारीख. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक