लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी शासनाने करार केलेल्या कंत्राटदाराकडून शाळांना अन्नधान्याचा पुरवठा केला होता. मात्र कंत्राटदार अन्न धान्याची पोच शाळांना देताना त्याचे वजन करुन न देता मापात पाप करत होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षण विभागाने याची गांर्भियाने दखल घेत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र देताच अन्नधान्याचे पोच देतांना नियमानुसार वजन करुन देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे अनेक शाळांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिले जाते. यासाठी तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा करार केलेल्या संबंधित कंत्राटदाराकडून शाळांना केला जातो. नियमानुसार शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करतांना त्याचे वजन करुन देणे अनिवार्य आहे. मात्र संबंधित कंत्राटदार या नियमांना धाब्यावर बसवून वजन न करताच पोषण आहाराचा पुरवठा करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली होती.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी हरी राईस अॅन्ड अॅग्रो कंपनी पत्र देऊन वजन करुनच शाळांना पोषण आहाराचा पुरवठ्याचे करण्याचे निर्देश दिले. तसेच पोषण आहाराच्या अन्नधान्याच्या पुरवठा करणाºया गाडीत वजनकाटे सोबत ठेवण्याची नोटीस बजावली होती. अन्यथा कंत्राट रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.यानंतर सदर कंपनीने याची गांर्भियाने दखल घेत बुधवारपासून (दि.११) शाळांना पोषण आहाराच्या अन्नधान्याचे वितरण हे वजन करुन देण्यास सुरूवात केली.गाडीसोबत इलेक्ट्रानिक वजनकाटा सोबत ठेवला आहे.शाळांची तक्रार दूरकंत्राटदाराकडून पुरवठा करण्यात येणाºया शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या प्रती कट्टयामागे दोन तीन किलो धान्य कमी दिले जाते होते.यामुळे शाळांचे सुध्दा नुकसान होत होते. मात्र आता पोच देताना वजन करुन दिली जात असल्याने कमी धान्य मिळत असल्याची तक्रार सुध्दा दूर झाली आहे.
अखेर वजन करून धान्याची पोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST
जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करुन शिक्षण विभागाचे याकडे लक्ष वेधले होते.तसेच ६ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील जि.प.शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करताना त्याचे वजन न करताच कसे वितरण केले जाते.हा प्रकार सुध्दा उघडकीस आणला होता.
अखेर वजन करून धान्याची पोच
ठळक मुद्देलोकमत बातमीचा परिणाम : शिक्षण विभागाने घेतली दखल, मापातील पाप दूर