शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वरूणराजाच्या कृपेने शेतकरी सुखावला

By admin | Updated: August 4, 2016 00:02 IST

मागील १०-१२ दिवसांपासून सतत पावसाची वाट बघणारा बळीराजा दोन दिवसातील पावसाने सुखावला आहे.

रोवणीला पुन्हा प्रारंभ : पावसाची दमदार हजेरी सालेकसा/गोरेगाव : मागील १०-१२ दिवसांपासून सतत पावसाची वाट बघणारा बळीराजा दोन दिवसातील पावसाने सुखावला आहे. सोमवारपासून वरूण राजाच्या कृपेने दमदार पाऊस पडत आहे. सालेकसा, गोरेगाव तालुक्यासह अनेक तालुक्यात पावसाने धमाकेदार पुनरागमन केल्याने काही नाल्यांना पूर येऊ्य मार्ग बंद झाल्याने नागरिकांची काहीशी गैरसोय झाली असली तरी पावसाची गरज असल्यामुळे सर्वांना समाधान व्यक्त केले आहे. मंगळवारी सर्वत्र पाणीच पाणी साचलेले होते. काही नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाले होते. त्यामुळे शाळांनाही सुटी देण्यात आली होती. बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पूर ओसरला होता. पावसाअभावी सर्वत्र रोवण्या मधातच खोळंबल्या होत्या. मागील आठ दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांची रोवणी व इतर ही शेतीची कामे बंद असून शेतीची औजारे निकामी पडले होते. परंतु आता मागील दोन दिवसात पुरेसा पाऊस पडला असून पुढील एक आठवड्यात सालेकसा तालुक्यात १०० टक्के भात रोवणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी) प्रथमच मेघगर्जनेसह पाऊस यंदा पावसाचे आगमन पावसाच्या वाहनाप्रमाणे झालेले दिसून आले. सुरूवातीपासून आतापर्यंत पावसाने धावत्या स्वरूपात हजेरी लावली कारण की त्याचे वाहन कोल्हा आणि बेडून होते. कोल्हा आणि बेडकाला पावसाची गरज कमी असते तसेच त्यांची चाल धावती व उडी मारणारी असते. त्याचप्रमाणे पाऊस पण उडी मारत वादळ वाऱ्यासह धावत येत गेला आणि जात गेला. त्यामुळे तलाव जलाशयामध्ये हवे तेवढे पाणी साचले नाही. आता दोन दिवसांपासून पावसाचे वाहन हत्ती झाले असून हत्तीच्या गरजेप्रमाणे व त्याच्या चालीप्रमाणे पाऊस पडताना दिसून आला. हत्ती हा सर्वात जास्त पाणी पिणारा प्राणी असून तो कधीही धावत जात नाही. गर्जना करीत डौलाने चालत असतो. नेमका त्याचप्रमाणे पाऊस सुध्दा मेघगर्जनेसह डौलाने झमाझम पडताना दिसून आला. गावमोहल्यातील नाल्या, गटारे प्रथमच लबालब भरून जाताना दिसली.