शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीसाठी केवळ २१० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:45 IST

जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवार संभ्रमात : राजकीय घडामोडींना वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी (दि.२७) सहावा दिवस होता. सहा दिवसांच्या कालावधीत केवळ २१० उमेदवारांनी नामाकंन अर्ज दाखल केले.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या कालावधीत उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३४७ सरपंच व २९३९ सदस्य पदांसाठी आतापर्यंत १९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात अद्याप नामांकन अर्ज दाखल झालेले नाही. येत्या १६ आॅक्टोबर रोजी ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास चांगलीच दमछाक करावी लागत आहे.२९ सप्टेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी देखील नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र नव्हते. जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह २९३९ ग्रा.पं.सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आजपर्यंत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. तर तिरोडा येथे ५८ नामांकन असे एकूण ६८ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गोंदिया येथे सरपंचपदासाठी १० तर सदस्यपदांसाठी २८ असे एकूण ३८, सालेकसा तालुक्यात सरपंचपदासाठी ७ तर सदस्यपदासाठी ३० असे एकूण ३७, सडक-अर्जुनी तालुक्यात सरपंचपदासाठी ८, गोरेगाव तालुक्यात सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी ११ असे एकूण १३ व देवरी तालुक्यात भागी आणि सिरपूर या दोन गावांच्या सदस्यपदासाठी फक्त २ अर्ज प्राप्त झाले आहेत. असे एकूण जिल्ह्यात २१० नामांकन अर्ज यंत्रणेकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.नामांकन अर्ज दाखल करण्याचा सहावा दिवस असूनही आमगाव तालुक्यातील निवडणूक यंत्रणेकडे अद्याप नामांकनाचे खाते उघडलेले नाही. नामांकन दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.