शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीच्या धान खरेदीत शासनाचा आखडता हात

By admin | Updated: September 26, 2015 01:47 IST

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अनियमित पावसाने यावर्षी कमी उत्पन्न होण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

खरेदी मर्यादा घटली : शेतकऱ्यांना धान विकावा लागणार व्यापाऱ्यांनागोंदिया/बाराभाटी : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अनियमित पावसाने यावर्षी कमी उत्पन्न होण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून हमीभावानुसार धान खरेदी करताना प्रतिहेक्टर २५ क्विंटलवरून २० क्विंटल अशी मर्यादा घटविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित धान कमी दराने व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागणार आहे.राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक आदिवासी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही एजन्सींना जारी केले आहे. त्यांच्यामार्फत हे परिपत्रक धान खरेदी करणाऱ्या सरकारी संस्थांना पाठविण्यात आले आहे. हा सर्रास शेतकऱ्यांवर कुटाराघात असल्याचा आरोप सहकारी संस्थांचे पदाधिकारी करीत आहेत.पावसाअभावी यावर्षी पिकांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे धानाचे उत्पन्न यावर्षी घटणार आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. असे असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना मारक ठरणारा हा निर्णय कसा काय घेतला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यापूर्वी प्रत्येक वेळी प्रतीहेक्टरी २५ क्विंटलनुसार शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावानुसार खरेदी केली जात होती. मात्र आता मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या सर्व शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धान खरेदी करताना शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतजमिनीनुसार प्रतीहेक्टर २० क्विंटल, अर्थात एकरी ८ क्विंटल एवढाच स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे एकरी ८ क्विंटलपेक्षा जास्त पिकणारा धान शेतकऱ्यांना सरळ व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यात व्यापारीवर्गाकडून शेतकरी वर्ग नाडवल्या जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)समितीच्या अहवालावरुन बदलविले निकषअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचे परिपत्र जारी करताना भंडारा जिल्ह्यात हंगाम २०१३-१४ मध्ये धान खरेदी करताना झालेल्या अनियमिततेचा संदर्भ दिला. ही अनियमितता तपासणीसाठी ज्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती त्या समितीच्या शिफारसीवरून आधारभूत खरेदीचे निकष बदलविल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांचे हे चुकारे त्यांच्या बँक खात्यातच जमा होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बँक खाते व आधार कार्ड लिंक करून त्याची आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर धानाचे चुकारे आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी अभिकर्ता संस्थांची राहणार आहे.