शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने २० हजार शेतकऱ्यांना धरले वेठीस

By admin | Updated: August 3, 2015 01:22 IST

विविध समस्यांचा सामना करून धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने बोनस व धानाचे चुकारे न दिल्यामुळे

बोनस व चुकारे अडले : ५० कोटी १० लाखांची मागणीनरेश रहिले  गोंदियाविविध समस्यांचा सामना करून धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने बोनस व धानाचे चुकारे न दिल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात खरिपाचा हंगाम कसा घ्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्ह्यातील २० हजार ४५० शेतकऱ्यांचे ५० कोटी ९ लाख ८९ हजार ७५० रूपयांचे चुकारे अद्याप झालेले नाही. यातून शासनाने या शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचाच हा प्रकार दिसून येत आहे. धानाला भाव नाही, त्यातच कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षण या प्रकारामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर मुलीच्या लग्नाचे ओझे, मुलांचे महागडे शिक्षण यातून स्वत:ला सावरण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांना महागडी औषधी खरेदी करतांना कंबरडे मोडते. आलेल्या अल्पशा उत्पन्नातून आपला संसार सावरण्याची स्वप्न रंगविणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे. हाती चार पैसे येणार उद्देशातून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले. याशिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीत मदतीचा हात म्हणून बोनस घोषीत केला. धानाचे चुकारे व बोनसची रक्कम हाती आल्यावर त्या पैशातून खत, कीटकनाशक, औषधी खरेदी करण्याचे नियोजन होते. परंतु शासनाने त्यांच्या धानाचे चुकारे दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व नियोजन फिसकटले. हक्काचा पैसा मिळाला नसल्याने जिल्ह्यातील २० हजार शेतकरी शासनाच्या चुकीमुळे दारोदारी उसनवारीवर पैसे मागण्यासाठी भटकत आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २० हजार ४५० शेतकऱ्यांकडून ७ लाख ४३ हजार ७६५ क्विंटल धान्य खरेदी केले. त्या धानाचे चुकारे व प्रति क्विंटल धानाचा बोनस असा एकूण १ अब्ज १९ कोटी ७४ लाख ९० हजार ६८ रूपये द्यायला हवे होते. परंतु शासनाने यापैकी ६९ कोटी ६५ लाख ३१८ रूपयेच दिले आहेत. तर ५० कोटी ९ लाख ८९ हजार ७५० रूपयांची मागणी अनेक दिवसापासून होत असताना शासनाने देशाच्या पोशिंद्यालाच उपाशी ठेवण्याचे ठरविले आहे.