शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्टतर्फे तालुक्यातील खातीया येथे बुधवारी वैयक्तीगत लाभ योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले,पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प.सदस्य विजय लोणारे,टिकाराम भाजीपाले,दिनेश अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : खातिया येथे वैयक्तिक लाभ योजना शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तेवर आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकांपूर्वी दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर केवळ २ लाख रुपयांपर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. तसेच धानाला प्रती क्विंटल २५०० हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची देखील पुर्तता केली नसून अद्यापही बोनसचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही.त्यामुळे राज्यातील विद्यमान सरकारने त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी खातीया येथे आयोजित कार्यक्रमात केली.प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्टतर्फे तालुक्यातील खातीया येथे बुधवारी वैयक्तीगत लाभ योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले,पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प.सदस्य विजय लोणारे,टिकाराम भाजीपाले,दिनेश अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, विमा कंपनीच्या नियमानुसार ७ ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास पीक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ देणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात सरकार अपयशी ठरल्याची टिका अग्रवाल यांनी केली. तर ट्रस्टच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन आपण जनतेच्या पाठीशी सदैव राहू अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. शिबिरात श्रावनबाळ योजनेचे २३, किमान सन्मान निधीचे ३०,आयुष्मान भारत योजनेचे १६७, कामगार कल्याण योजनेची ३९ प्रकरणे मार्गी लावण्यात आली.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल