शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दबावात पाडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:19 IST

तिरोडा नगर पालिकेच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याचा ठपका ठेवून सूडबुद्धिने नगर पालिका प्रशासनाने राजकीय दबावात .....

ठळक मुद्देपालिकेची नियमबाह्य कार्यवाही : मतदान न केल्याचा फटका, नागरिकांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा नगर पालिकेच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याचा ठपका ठेवून सूडबुद्धिने नगर पालिका प्रशासनाने राजकीय दबावात बुधवारी (दि.२९) नियमबाह्य कार्यवाही करुन एका गरीब दलित व्यक्तींचे बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.प्रेमलता सूर्यभाव गजभिये यांचे शहरातील जुनी वस्ती येथे स्वत:चे वडिलोपार्जित राहते घर आहे. चार मुलांच्या त्यांच्या संसारात अल्पावधित मुलीला वैधव्य प्राप्त झाले. त्यामुळे मुलीच्या अपंग मुलासह सर्व जबाबदारी प्रेमलता यांच्यावर आली. अशातच लहान मुलाची खासगी ठिकाणातील नोकरी सुटली. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मुलीला मिळणारे निराधाराचे ६०० रुपये आणि प्रेमलता यांना मिळणाºया बिडीच्या हजार रुपयांच्या पेन्शनमधून घर कसे चालवावे, असा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर होता.मुलगी शिवणकला शिकली असल्याने तिला घरासमोर एक छोटेखानी रुम काढून शिवणकलेचे दुकान लावण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी इकडून-तिकडून पैशांची जुळवा-जुळव करण्यात आली. घरातील थोडेफार दागिने गहाण टाकण्यात आले. बांधकाम थोडे वर आले आणि त्यातच पालिका प्रशासनाने सूड उगविला. सगळे बांधकाम क्षणात जमीनदोस्त केले. नगर पालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला मतदान न केल्याचा ठपका ठेवत शेजारच्याच काही लोकांनी बांधकाम अतिक्रमणात असल्याची तक्रार केली.त्यावर पालिका प्रशासनाने प्रेमलता यांना दिनांक १६ सप्टेंबर रोजी बांधकामाची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत सुरु असलेले बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले. प्रेमलता यांनी बांधकाम थांबवून २० सप्टेंबर रोजी नगर पालिकेच्या नोटिसचे उत्तर दिले. बांधकामाची परवानगी घेतली नसल्याची चूक झाली असल्याचे पत्रात नमूद करुन बांधकामाची परवानगी देण्याची विनंतीसुध्दा त्यांनी पत्रातून केली. मात्र, पालिका प्रशासनाने या पत्राबाबत कोणतेही उत्तर दिले नाही. किंबहूना प्रेमलता यांची जागेची रजिस्ट्रीची कोणतीही तपासणी केली नाही. वास्तविकत: तक्रारकर्ते आणि प्रेमलता या दोघांना बोलावून त्यांच्या जागेच्या रजिस्ट्रीची पाहणी करणे गरजेचे होते. परंतु तशी कोणतीच प्रक्रिया नगर पालिका प्रशासनाने पार पाडली नाही.उल्लेखनीय म्हणजे प्रेमलता यांनी पालिका प्रशासनाला नोटीस येण्यापूर्वीच एक पत्र देवू केले. मात्र त्यांचे पत्र स्वीकारण्यातच आले नसल्याचे प्रेमलता यांनी सांगितले. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुनीवस्तीमधील सर्वच घरे आबादीच्या जागेत आहेत. वस्तीच्या मधातून बाजाराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. रस्त्याला लागून असणाºया नालीच्या बांधकामानंतर वस्तीतील लोकांनी आपल्या घराचे बांधकाम केले. तसेच बांधकाम प्रेमलता यांनी सुध्दा सुरु केले होते. बांधकाम जर अतिक्रमणात होते तर अतिक्रमण कोणत्या आधारावर ठरविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याला केंद्रबिंदू ठरवून त्याचे मोजमाप का करण्यात आले नाही. याच रस्त्यावर अनेकांनी आपले बांधकाम आणले, त्याबाबत पालीका प्रशासनाची भूमिका काय. संपूर्ण बांधकाम अतिक्रमणात होते का, जर नव्हते तर अतिक्रमणात असलेलेच बांधकाम का पाडण्यात आले नाही, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने वस्तीतील लोकांत चर्चेत आहेत. दरम्यान पालिका प्रशासनाने केवळ बांधकामाची परवानगी नसल्याचा ठपका ठेवून राजकीय सूडभावनेतून केल्याचा आरोप आहे. या बांधकामाला लागलेला पैसा पालिका प्रशासनाने भरुन द्यावा, अशी मागणी प्रेमलता गजभिये यांच्यासह वस्तीतील लोकांनी केली असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा गजभिये यांनी दिला आहे.शहरातील अतिक्रमणाचे काय?तिरोडा शहरातील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. शहरातील खैरलांजी रोडवर अनेकांनी अतिक्रमण केले. त्यामुळे नेहमीच याठिकाणात रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. जुन्या रुग्णालयाच्या परिसरात, शहिद मिश्रा शाळेसमोर, रेल्वे स्टेशन रस्त्यावर अनेकांचे अतिक्रमण आहे. एवढेच नव्हे तर काही राजकीय व नगर पालिकेतील कर्मचाºयांचे घर सुध्दा अतिक्रमणात येते. त्यावर कोणतीच कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही.