शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे आदेश निघाले आम्हाला नाही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:47 IST

शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

ठळक मुद्दे३५ रुपये प्रती किलो तुरडाळ : स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मात्र यासंबंधीचे आदेश अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाकडे पोहोचले नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अजूनही ५५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा केला जात असल्याने ते अडचणीत आले आहे. परिणामी शासनाचे आदेश निघाले, आम्हाला नाही मिळाले अशीच स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे शासनाने शासकीय हमीभावाने तुरीची खरेदी केली. तर तूर खरेदीवरुन बराच वाद देखील निर्माण झाला होता. खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी सरकारी गोदामात सुध्दा जागा नव्हती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने तुरीची भरडाई करुन तुरडाळ तयार केली.त्यानंतर या तुरडाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकान, सहकारी संस्था, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, ग्राहक सोसायट्यांना पुरवठा केला.मात्र खासगी बाजारपेठेत तुरडाळीचे दर घसरल्याने ५५ रुपये प्रती किलो तुरडाळीला ग्राहकांची मागणी नव्हती. शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात तुरडाळीचा साठा असल्याने सरकारसमोर सुध्दा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने आठवडाभरापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वस्त धान्य दुकानदारांना ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती सर्वांपर्यंत पोहचलीे.त्यामुळे शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकारांना ३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचे मागणी करीत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना अद्यापही या दराने तुरडाळीचा पुरवठा झाला नसल्याने त्यांना शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे शिवचरण कापगते, किशोर वैद्य, उध्दव परशुरामकर या स्वस्त धान्य दुकानदारांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शासनाने यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.स्वस्तधान्य दुकानदारांची पुरवठा विभागाकडे धाव३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचे आदेश अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पुरवठा विभागाकडून ५५ रुपये प्रती किलो दरानेच स्वस्त धान्य दुकानदारांना तुरडाळीचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या घोषणेमुळे शिधापत्रिकाधारक ५५ रुपये प्रती किलोची तुरडाळ घेण्यास तयार नाही. तर आम्ही ५५ रुपये प्रती किलोप्रमाणे डाळीचे पैसे भरले मात्र त्यानंतर शासनाचे नवीन आदेश धडकल्यास आमचे नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.३५ रुपये प्रती किलो दराने तुरडाळीचा पुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यानंतर यातील फरकाची रक्कम कपात करुन तेवढी तुरडाळ स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे कुठलेही नुकसान होणार नाही.- ए.के.सवई, जिल्हा पुरवठा अधिकारीे, गोंदिया.शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचे आदेश पोहचण्यास तीन महिने लागले होते. तिच स्थिती आता तुरडाळीच्या बाबतीत होणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.- डॉ.अविनाश काशिवार, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, डव्वा.