शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

By admin | Updated: September 13, 2014 23:59 IST

निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी लागू केल्यानंतर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

विधानसभा निवडणूक : अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चितगोंदिया : निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी लागू केल्यानंतर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी यांनी शनिवारी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या कार्यशाळेला जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी चोरमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के. लोणकर प्रामुख्याने उपस्थित होते. गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये २००९ च्या निवडणुकीच्या वेळी एकूण ८ लाख ७० हजार २७२ मतदार होते. यावेळी त्यात १ लाख ४८ हजार २९६ मतदारांची भर पडल्याने मतदारांची एकूण संख्या १० लाख १८ हजार ५६८ झाली आहे. चारही विधानसभा मतदार संघांबाबतची सविस्तर माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात प्रत्येक मतदार संघात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तीन-तीन भरारी पथके तैनात राहणार आहेत. याशिवाय तीन-तीन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि व्हिडीओ चित्रिकरण करणारी टीम राहणार आहे. राजकीय पक्षांच्या मिरवणुका, सभा, पेंडॉल येथे चित्रीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे ५० हजारापेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगणाऱ्या कोणत्याही नागरिकाची तपासणी होऊ शकते. त्यासाठी त्यांना संबंधित रकमेबद्दलची कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच १० लाखापेक्षा जास्त रकमेची तपासणी आयकर विभागाकडून होणार असल्याचे सांगण्यात आले. अर्जुनी मोरगाव मतदार संघात अर्जुनी, सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. तिरोडा मतदार संघात तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया मतदार संघाचा काही भाग समाविष्ठ होतो. आमगाव मतदार संघात आमगाव, देवरी आणि सालेकसा हे तीन तालुके तर गोंदिया मतदार संघात केवळ गोंदिया तालुक्याचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)