शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा फैसला आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:52 IST

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज : २५ विषयांवर होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.१८ जुलैची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आता बुधवारी (दि.१२) सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेत काही महत्वाचे विषय असल्याने सर्वांच्या नजरा सभेकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे, सरकारी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय सध्या चर्चेत आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वेने सहमती दर्शविली असताना नगर परिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. अशात आता या सभेत सरकारी तलावाच्या विषयावर काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले. याशिवाय, शहरातील सुभाष उद्यानात नागरिकांची गर्दी वाढत असून तेथे क्रीडा सहित्य लावण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे बागेत क्रीडा साहित्य लावण्याबाबतचा विषय सभेत मांडला जाणार आहे. पिंडकेपार येथील बाग तयार झाली असून त्या बागेला राष्ट्रसंत तुकाराम महाराज उद्यान हे नाव देण्यात यावे याबाबतचा विषय मांडला जाणार आहे.शहरातील सुर्याटोला, कुंभारेनगर, परमात्मा एक नगर अंतर्गत ग्रीनबेल्टमध्ये आरक्षीत जागेला यलो बेल्टमध्ये परिवर्तीत करणे, नगर परिषदेच्या जागांवर सुरक्षाभिंत बांधकाम व डीएलआर करणे, म्हाडासाठी आरक्षीत जागेचे आरक्षण यथास्थितीत ठेवणे, पोलीस क्वार्टरसाठी आरक्षीत जागेचे आरक्षण वगळून निवासी क्षेत्रात समाविष्ट करणे, स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत आवश्यक कामे करणे, नागरी वन व्यवस्थापन समितीची स्थापना, जीर्ण पंप हाऊस तोडून नव्याने बांधकाम करणे, शहर उपजिवीका केंद्राची स्थापना यासह अन्य विषयांवर चर्चा केली जाणार आहे.नगर परिषद शाळांचा होणार कायापालटसभेत नगर परिषदेच्या शाळांमध्ये सौर वीज प्रकल्प लावणे तसेच शाळांच्या मैदानात सौर पथदिवे लावण्याबाबतचा विषय वीज विभागाडून मांडण्यात आला आहे. याशिवाय, शाळांची रंगरंगोटी करण्याचा विषय ठेवण्यात येणार असल्याने या विषयांना मंजुरी मिळताच नगर परिषद शाळांतील सुविधांमध्ये वाढ होणार आहे.होर्डिंग्स व बॅनरचा पसारा हटणारशहरात बघावे तेथे होर्डींग व बॅनर लावले जात असून यामुळे शहर सौंदर्यीकरण व नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील होर्डिग्स व बॅनरचा पसारा नियंत्रणात यावा यासाठी विशेष ठिकाण निश्चीत करणे याबाबतचा विषय सभेत मांडला जाणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना