शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरूस्तीवर शासकीय निधीची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 01:25 IST

राज्य शासनाने ग्रामीण रस्ते राज्यमार्गाशी जोडून वाहतूक संपर्क सुलभ करण्यासाठी डांबरीकरण रस्ते बांधकामाला सुरूवात केली.

सहा महिन्यांतच रस्त्यांची वाताहत : सिमेंट काँक्रिट रस्त्यांची मागणी आमगाव : राज्य शासनाने ग्रामीण रस्ते राज्यमार्गाशी जोडून वाहतूक संपर्क सुलभ करण्यासाठी डांबरीकरण रस्ते बांधकामाला सुरूवात केली. परंतु डांबरीकरण रस्ते बांधकामात दुरूस्तीचे कार्य गुणवत्ताहीन असल्यामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. नागरिकांनी डांबरीकरण रस्त्यांना थांबवून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची मागणी केली आहे. राज्यातील ग्रामीण रस्ते राज्य महामार्गाला जोडून, ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ व्हावी व ग्रामीण उद्योग व्यवसायांना व रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने रस्ते बांधणी योजना कार्यान्वित केली. रस्ते बांधकाम व दुरूस्ती गतीशील व्हावी यासाठी शासनाने रस्ते बांधकामासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती केली. योजनेला निधी मंजूर करून रस्ते बांधकाम दुरूस्तीला गती देण्यात आली. परंतु शासनाकडून रस्ते बांधकाम दुरूस्तीला मिळणारा निधी खर्च करूनही निर्माण होणारे रस्ते अधोगतीला पोहोचले. ग्रामीण भागातील दळणवळण शहरांच्या दिशेने गतीशील व्हावी यासाठी शासनाने डांबरीकरण रस्ते व दुरूस्तीला योग्य दिशा दिली. परंतु निर्माण होणारे डांबरीकरण रस्ते अवघ्या सहा महिन्यांतच उखडले. त्यामुळे रस्त्यांवर पडणारे खड्डे, बाहेर पडणारे भगदाड वाहतुकीला आव्हाण देणारे ठरत आहेत. शासनाकडून दरवेळी रस्ते विकास बांधकामावर कोट्यवधी रूपयांचा निधी उधळला जात आहे. रस्ते बांधकाम झाल्यानंतर अवघ्या अल्प कालावधीत रस्त्यांवर पडणारे खड्डे अपघातांना आमंत्रण देतात. ग्रामीण भागातून गेलेल्या राज्यमार्गावर डांबरीकर रस्त्यांच्या वाताहतीमुळे दरवर्षी मार्ग बाधीत होतात. तर वाहनांच्या अपघातामुळे अनेक नागरिकांचा बळी जात आहे. मात्र अपघातांची दखल केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरूस्तीपर्यंतच असते. त्यामुळे डांबरीकरण रस्ते बांधकाम दुरूस्तीवरील कामांवर कोट्यवधींचा निधी मुरत जातो. शासनाने डांबरीकरण रस्ते बांधकाम दुरूस्तीवरील खर्चाची खातरजमा करून याबाबत निर्णय घ्यावे. तसेच डांबरीकर रस्त्यांची बांधणी बंद करून नागरिकांना दळणवळणासाठी सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधणीला हिरवा कंदील द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.