भाजप जिल्हा मेळावा : रक्तदान शिबिराचे आयोजनआमगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताकरीता पावले उचलली असून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. जनधन योजना, विमा योजना, पेंशन योजना, सुकन्या योजना आदी अनेक योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे कार्य सरकार करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.आमगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित ते करीत होते. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात पुर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश प्रवक्ता गिरीष व्यास, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, संघटनमंत्री आशिष वांदिले, प्रदेश सचिव, मोरे, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, दयाराम कापगते, केशवराव मानकर, भेरसिंह नागपूरे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, जि.प. कटरे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दीपक कदम, वीरेंद्र अंजनकर, रचना गहाणे, सिंता रहांगडाले, अशोक इंगळे, झामसिंग येरणे, गोविंदराव पुंड, संजय कुलकणी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. बडोले म्हणाले, आपल्या गावाचा विकास करण्याकरीता शासन निधी देतो. याकरीता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपली सत्ता येणे गरजेचे आहे. याकरीता शासन निधी देतो. याकरीता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपली सत्ता येणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह व आश्रमाळांची सुधारणा करण्याचे कार्य सुरु आहे. मागील सरकारने रेंगाळत ठेवलेल्या १२३ अपंगांच्या शाळांना एकाच दिवशी मान्यता देण्याचे कार्य आम्ही केले आहे. गरिबांच्या मुलांना रोजगार मिळावा याकरीता बार्टीच्या माध्यमातून कार्य सुरु असून गोंदिया येथे १९ व २० रोजी हजारो बेरोजगार तरुणांना शिबिराच्या माध्यमातून निवड करुन प्रशिक्षण व रोजगार देण्यात येत आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सदस्यता अभियानाची जिल्ह्यात लक्षपुर्वी झाल्याची माहिती दिली. आगामी जि. प. व पं.स. निवडणुकीकरीता कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून शासनाच्या योजनांची माहिती देवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)
हे सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांचे- बडोले
By admin | Updated: May 21, 2015 01:10 IST