शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

समस्या सोडविण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:23 IST

देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : चुल्हाडात काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची बेहाल करणाºया एनडीए व युतीचे शासनाला मावा, तुडतुडा लावण्यासाठी कंबर कसून सज्ज राहण्याचे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.चुल्हाड येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले होते. अतिथी म्हणून माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, प्रदेश सचिव ढेंगे, आशावरी देवतळे, प्रमोद तितीरमारे, के.के. पंचबुध्दे, शिवलाल नागपुरे, डॉ. पंकज कारेमोरे, वाहनीचे सरपंच गळीराम बांडेबुचे, मोहाडीचे तालुकाध्यक्ष प्रभु मोहतुरे,तालुकाध्यक्ष शंकर राऊत, बंडु चौरीवार, सहादेव तुरकर, मधुकर लिचडे मंचावर उपस्थित होते.आ.वड्डेटीवारम्हणाले, राज्यात उंदिर घोटाळा सुसुंदरीने उघडकीस आणला. पंरतु पुढील कारवाईकरिता समोर आली नाही. राज्यात उद्योगपतीचे भले करण्यात शासन व्यस्त आहे. शेतकरी मदतीपासुन वंचित आहे. बेरोजगारी गंभिर समस्या असून वाढत्या बलात्काराचे घटनावर सरकारचे मंत्री बेताल व्यक्तव्य करीत आहे.या सरकारला आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत सर्व सामान्य जनतेचे शासन आणण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकटीकरिता कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे.या मेळाव्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी व पचांयत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत विजय वड्डेटीवार आणि नाना पटोले यांनी केले. प्रास्ताविक सादर करतांना रमेश पारधी म्हणाले, राज्य शासन जनतेला उपेक्षीत करीत आहेत. शेतकरी, कष्टकरी बांधवाचे वाढत्या समस्या आहे. थ्रीफेज विज पुरविण्यात या सरकारचे काळात एक सेकंद ही वाढ करण्यात आली नाही.राजीव सागर धरणाचे पाणी चांदपुर जलाशयात सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. गरीबांना चटके देणाºया सरकारचे निषेध करीत भाजप पक्ष सोडण्याची घोषणा केली. यावेळी कलाम शेख यांनी नेतृत्वाचा खरपुस समाचार घेतला. या मेळाव्याला माजी खासदार नाना पटोले, बंडु सावरबांधे, प्रभु मोहतुरे यांनी संबोधीत केले. काँग्रेस पक्षात भाजप हा रामराम ठोकून ६०० कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.यात चुल्हाडच्या सरपंच शिला चौधरी, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश पारधी, सतिष पटले, विलास खरवडे, बपेराचे माजी पंचायत समिती सदस्य अजय खंगार, भाजप दलीत आघाडीच्या अध्यक्षा साधना वालदे, अनिल खंगार, देवसर्राचे माजी उपसरपंच कटरे, गोंडीटोलाचे सरपंच नंदलाल रहांगडाले, किशोर रहांगडाले, महालगावचे योगेश चौरे, पारपिंडकेपारचे माजी सरपंच ओमकांत बुरडे, मोहाडी खाणचे सरपंच सुनिल माने, अंबादास कानतोडे, कुवर बुध्दे, गोंदेखारीचे अर्जुन राणे, बिनाखीचे सरपंच कविता बघेले, भाजप बुध कमीटीचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम तथा देवरी (देव), सुकडी (नकुल), टेमनी, चांदपुर, मांगली गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट काँग्रेसाशी झाला.आयोजित मेळाव्याचे संचालन शंकर राऊत, रामेश्वर मोटघरे यांनी केले. तर आभार रमेश पारधी यांनी केले.