शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावाजवळच्या नदी-नाल्यातून रेती उपलब्ध करून देण्याचे शासन निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम मंद गतीने ...

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम मंद गतीने होत आहे. एवढेच नव्हे तर न परवडणार्‍या किमतीमध्येही रेती उपलब्ध होत असल्याने लाभार्थी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यातल्या त्यात राज्य शासनाने घरकुल लाभार्थींसाठी ५ ब्रास रेतीची सवलत दिली आहे. मात्र, ती रेतीदेखील दूरच्या घाटातून आणणे न परवडणारे आहे. ही बाब आमदार विनोद अग्रवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, महसूल विभागाने गृहनिर्माण प्रयोजनासाठी ५ ब्रास रेती पर्यावरण नियमांच्या अधिन राहून स्थानिक तहसीलदारांच्या परवानगीने जवळील घाटातून उपसा करता येईल, असे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील घरकूल लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहे. अतिदुर्बल घटकातील लाभार्थी असल्याने त्यांना रेती उपलब्ध होत नाही. किंबहुना न परवडणार्‍या किमतीमध्ये रेती उपलब्ध होत असल्याने घरांचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. पर्यायाने घरकूल बांधकाम रखडलेले आहे. अनेक गावांत रेती घाट नसल्याने अशा गावांना दुसऱ्या तालुक्याशी जोडण्यात आले आहे. तेथून रेतीची वाहतूक करणे परवडणारे नाही. लाभार्थींना ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आ. अग्रवाल यांनी केली होती. यानुरूप ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, अनेक लाभार्थींच्या गाव व ठिकाणापासून दूर अंतरावर रेती घाट असल्याने तेथून रेती उपलब्ध करणे लाभार्थींना कठीण जात आहे.

ही बाब आमदार अग्रवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे महसूलमंत्र्यानी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत लाभ घेणार्‍या व्यक्तीस तहसीलदारांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू उत्खनसाठी पर्यावरण अनुमती घेऊन लिलावासाठी निश्चित केलेल्या मात्र यशस्वी बोली न झालेल्या वाळू घाटांपैकी किंवा या कारणास्तव जिल्हाधिकार्‍यांकडून विशेषत: राखीव ठेवण्यात आलेल्या वाळू घाटांपैकी गृहनिर्माणच्या प्रयोजनासाठी लाभार्थींना स्वत:च्या बांधकामाकरिता ५ ब्रास रेती काढण्याची परवानगी देता येईल, अशी तरतूद करण्याची सूचना केली. त्यामुळे आता घरकूल लाभार्थींना गाव शिवारालगतच्या घाटातून तहसीलदारांच्या परवानगीने ५ ब्रास रेती उपलब्ध करून घेता येणार आहे. एकंदरीत आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे लाभार्थींनी त्यांचे आभार मानले.