शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दुचाकींनी करणार डॉट्सच्या उपचाराचे निरीक्षण

By admin | Updated: June 11, 2016 02:07 IST

जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे निदान, निरीक्षण व उपचार करण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत

रूग्ण शोध मोहीम : क्षय कर्मचाऱ्यांना दुचाकींचे वितरण गोंदिया : जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे निदान, निरीक्षण व उपचार करण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्रांतर्गत कार्यरत जिल्हाभरातील क्षय कर्मचाऱ्यांना शासकीय दुचाकी वाहनांचे वितरण सोमवार (दि.६) जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले. या वेळी एकूण १४ उपलब्ध झालेल्यांपैकी १३ वाहनांचे वाटप करण्यात आले. या वाहनांद्वारे क्षय कर्मचारी जिल्हाभरात क्षयरूग्णांचा शोध व डॉट्स उपचाराचे निरीक्षण करतील.सन १९६२ पासून देशात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यात सन १९९८-९९ पासून टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य क्षयरोग नियंत्रण सोसायटी व जिल्हा क्षयरोग सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कमीत कमी ९० टक्के नवीन थुंकी दूषित क्षयरूग्णांना बरे करणे व हा दर कायम राखणे तसेच अपेक्षित क्षयरूग्णांपैकी किमान ९० टक्के रूग्ण शोधणे व हा दर कायम राखणे, असे आहे.जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या तालुका क्षयरोग पथके व जिल्हा क्षयरोग पथके यात कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आरएनटीसीपी कार्यक्रमांतर्गत जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शिका केंद्रे, उपकेंद्रे, डॉट्स सेंटर, क्षयरूग्णांना भेटी आदी शासकीय कामांसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १४ शासकीय दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले होते. या आरएनटीसीपी शासकीय दुचाकी वाहनांचे पूजन करून जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.पी. गहलोत यांच्या हस्ते सदर वाहने वाटप करण्यात आले.या वेळी जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ.डी.एस. भूमकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक साकेत मोटघरे, खत्री, तोमर, बी.यू. बिसेन, श्रीरामे, अरविंद गजभिये, विलास राठोड, पंकज लुतडे, डी.बी. चौधरी, ए.एन. लोणारे, एस.व्ही. देव्हारी, धनेंद्र कटरे, निरज अग्रवाल, कांबळे, अशोक मुडपीलवार, कापसे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)