शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाचा २५० अंगणवाडी सेविकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:43 IST

राज्य सरकारने अंगणवाडीे सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअनेक अंगणवाड्या बंद होणार : अंगणवाडी सेविकांमध्ये रोष

ऑनलाईन लोकमतगोंदिया : राज्य सरकारने अंगणवाडीे सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला आहे. या निणर्याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील १५० अंगणवाडी सेविका आणि ९५ मदतनीस यांना बसला असून त्यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी तसेच कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी १९७५ पासून एकात्मीक बालविकास योजनेतंर्गत राज्यात अंगणवाड्यांची सुरूवात करण्यात आली. यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के निधी दिला जातो. यातूनच अंगणवाडी सेविकांचे मानधन आणि इतर खर्च केला जात होता. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात अंगणवाड्यांमुळे माता मृत्यू, बाल मृत्यू, कुपोषण आदीवर नियंत्रण मिळविण्यात बºयाच प्रमाणात यश आले होते. तसेच अंगणवाडी केंद्राच्या माध्यामातून गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींना सकस आहार दिला जात होता. बालकांमध्ये लहानपणापासून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यास मदत होती. अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. मात्र राज्य सरकारने नुकताच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तचे वय ६५ वरुन ६० करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निणर्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे वय ३१ मार्च २०१८ ला ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण अधिकाºयांना दिले आहे. या निणर्याचा फटका जिल्ह्यातील १५० अंगणवाडी सेविका आणि ९५ मदतनिस यांना बसला आहे. ऐन वृध्दावस्थेत रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाबद्दल अंगणवाडी सेविकांमध्ये रोष व्याप्त आहे.अंगणवाड्यांचे समायोजनज्या अंगणवाड्यांमधील बालकांची संख्या १५ पेक्षा कमी आहे अशा अंगणवाड्याचे जवळच्या अगंणवाडीमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या बंद होण्याचीे शक्यता असून अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे.रिक्त पदे न भरण्याचे आदेशजिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांची शेकडो पदे मागील वर्षभरापासून रिक्त आहे. ती पदे अद्यापही भरण्यात आलेली नाही. उलट सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० केल्याने २५० पदे पुन्हा रिक्त होणार आहे. मात्र रिक्त असलेली पदे सध्या न भरण्याचे निर्देश शासनाने महिला व बालकल्याण विभागाला दिल्याची माहिती आहे.