शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी समाजाची गोवर्धन पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:15 IST

येथील गोवारी समाज संघटनेच्यावतीने गोवर्धन पूजेचा कार्यक्रम बाजार चौकातील श्रीकृष्ण मंदिरामध्ये घेण्यात आला.

ठळक मुद्देगरीब दाम्पत्यास वस्त्रदान : कुलसुंगे यांचे दातृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : येथील गोवारी समाज संघटनेच्यावतीने गोवर्धन पूजेचा कार्यक्रम बाजार चौकातील श्रीकृष्ण मंदिरामध्ये घेण्यात आला.गायगोधनाचे औचित्य साधून गोवारी समाजबांधवाच्यावतीने श्रीकृष्ण मंदिरामध्ये काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तुळसीदास बोरकर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच राधेशाम झोळे, दे.मो. मानकर, डॉ. कुंदन कुलसुंगे, रत्नाकर बोरकर, शामकांत नेवारे, प्रमोद पाऊलझगडे, मोरेश्वर सावकार बनपूरकर, कुकसू मेश्राम, उपसरपंच वैशाली मानकर, साधू मेश्राम, नित्यानंद पालीवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना गोवारी समाज संघटनेकडून पान सुपारी वितरित करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच परिसरात वेळोवेळी समाजापयोगी उपक्रम राबवून गरजवंताच्या मदतीसाठी धावून जाणारे डॉ. कुलसुंगे यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून गावातील समाज घटकातील गरीब गरजू दाम्पत्यांस वस्त्रदान करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सामाजिक कार्यात सदोदित पुढाकार घेणारे डॉ. कुलसुंगे आपल्या विधायक कार्याने सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.यावर्षी गोवारी समाजातील प्रल्हाद राऊत व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यास कुर्ता, धोतर, साडी, चोळी, ब्लँकेट तसेच दिवाळीच्या फराळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन डॉ. शामकांत नेवारे यांनी केले. प्रास्ताविक दे.मो. मानकर यांनी मांडले. आभार सुभाष मानकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.पी.डी. राऊत, दुर्गा काळसर्पे, कैलास मानकर, दामोधर मानकर, कार्तिक मानकर आदींनी सहकार्य केले.