शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत गोरेगाव अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वाकांक्षी योजनेत यावर्षी गोरेगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. सन २०१७-१८ या वर्षात कृषी विभागामार्फत गोरेगाव तालुक्यात तब्बल १०० शेततळे पूर्ण करण्यात आले आहेत.तालुक्यातील मुख्य खरीप धान पिकास संरक्षित सिंचन, रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाची लागवड, पावसाचे पाणी ...

ठळक मुद्दे१०० शेततळे पूर्ण : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वाकांक्षी योजनेत यावर्षी गोरेगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. सन २०१७-१८ या वर्षात कृषी विभागामार्फत गोरेगाव तालुक्यात तब्बल १०० शेततळे पूर्ण करण्यात आले आहेत.तालुक्यातील मुख्य खरीप धान पिकास संरक्षित सिंचन, रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाची लागवड, पावसाचे पाणी शिवारात अडविणे, भूगर्भाच्या पाण्याचा पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी सरंक्षित सिंचन उपलब्ध करणे या उद्देशपूर्तीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती क रण्यात आली. तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत २५९ शेतकऱ्यांचे अर्ज आॅनलाईन भरुन घेतले. त्यापैकी पात्र शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देऊन विविध आकारमानातील शेततळ्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली.बांधकाम पूर्ण झालेल्या शेततळ्याच्या आकारमानाप्रमाणे ५०,००० रु. अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. मागील वर्षी पाथरी या गावातील झनकलाल चौरागडे यांनी २५-३०-३ मिटर आकाराचे शेततळे बांधून पूर्ण केले. याआधी चौरागडे यांना सरंक्षित सिंचन नसल्याने खरीप हंगामात पूर्णपणे पावसावर अवलंबून धान शेती करावी लागत होती. तसेच अनियमित पाऊस असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. तालुक्यात रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे रब्बी हंगामात बरेचशे क्षेत्र पडीक राहत होते. त्या अनुषंगाने त्यांनी शेततळे बांधण्याचा संकल्प करुन पूर्ण केला. आजघडीला तालुक्यातील बऱ्याच शेततळ्यात मुबलक प्रमाणावर पाणी साठून आहे. तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात शेतकरी शेततळी तयार करण्यात पुढे असून योग्य मार्गदर्शनामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शेततळ्यांचा योग्य फायदा होणार.गोरेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थीतीची समस्या लक्षात घेता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन केले. जलसंधारण व खरिपातील मुख्य पिकास बसणारा ताण यामुळे भात पिकाची उत्पादकता आता कमी होत होती. ती यापुढे शेततळे उपचारामुळे दिसून येणार नाही.- ए.एम.इंगळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदियासन २०१८-१९ या वर्षात उर्वरीत इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील कृषी सहाय्यक व तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा.-मंगेश वावधने,तालुका कृषी अधिकारी, गोरेगाव.