शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावचे ग्रामीण रुग्णालय ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

गोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अवघ्या २० खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे.

दिलीप चव्हाण - गोरेगावगोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अवघ्या २० खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे.ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे जानाटोला, घोटी, भंडगा, मुंडीपार, पिंडकेपार, गराडा, आसलपाणी, झांजीया, कटंगी, हलबीटोला, हिरडामाली, बोटे, म्हसगाव, सलंगटोला, बबई, गिधाडी या गावांतील रुग्ण येतात. सध्या वातावरण बदलामुळे तापाचे प्रमाण वाढले आहे. नागरिक विविध आजाराने ग्रस्त आहेत. यात ९० टक्के रुग्ण तापाने ग्रस्त आहेत. आज ग्रामीण रुग्णालयात ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी उपस्थित होते. अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप या तीन रोगांनी मोठ्या प्रमाणात पछाडल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.के. पटले यांनी सांगितले. ४०० ते ५०० रुग्णांना सेवा देण्यासाठी डॉ. सचिन पाटील, डॉ. पी.के. पटले व त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाई न केल्यामुळे डासांची संख्या वाढली. सोबतच दूषित पाणी पुरवठा, वातावरणात उष्णतेचे वाढलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे अनेक गावे आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांची व्यवस्था आहे. मात्र सद्या २० बेड रुग्णसंख्या वाढल्यामुळे खाटा कमी पडत आहेत. सध्या गोरेगाव रुग्णालय हाऊसफूल्ल असल्यामुळे रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था कुठे करावी, रुग्णांना सेवा कशी द्यावी हे गंभीर प्रश्न रुग्णालय प्रशासनाला भेडसावत आहे. वाढलेल्या रुग्णांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयात येणारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील रुग्णालयात २० खाटांवर २० रुग्णांना सेवा देणे सुरू आहे. मात्र नव्याने येणाऱ्या रुग्णांना खाटा कुठून द्यायच्या, असा प्रश्न आरोग्य प्रशासनाला पडला आहे. रक्त तपासणीसाठी विशेष सोय आहे. सोमवारी ७० संशयीत मलेरियाच्या रुग्णांचे रक्त तपासण्यात आले. इतर ५० रुग्णांचे रक्त तपासण्यात आले. सदर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कुठेही कमी नाही. सुसज्ज इमारतीत कारभार चालतो. रुग्णांच्या वाढलेल्या गर्दीमुळे तीन वैद्यकीय अधिकारी सेवेत कार्यरत आहेत.