शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

७० वर्षीय गोपिकाबाईची घरकुलासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:28 IST

केंद्र व राज्य सरकारने २०२४ पर्यंत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही बरेच दूरच आहे. हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मागील आठ वर्षांपासून ७० वर्षीय वृध्द महिलेची शासन दरबारी फरफट सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही.

ठळक मुद्देशासनाची योजना कागदावर : प्रशासनाचे दुर्लक्ष, घरकुल योजनेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : केंद्र व राज्य सरकारने २०२४ पर्यंत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अजूनही बरेच दूरच आहे. हक्काचे घरकुल मिळावे यासाठी मागील आठ वर्षांपासून ७० वर्षीय वृध्द महिलेची शासन दरबारी फरफट सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही.गोपीकाबाई उदारा बनकर (७०) रा. कोदामेडी असे त्या वृध्द महिलेचे नाव आहे. गोपिकाबाईला तीन मुले आहेत. ती आपल्या मुलांसह कोदामेडी येथे राहते. २०१४ मध्ये गोपिकाबाईच्या पतीचे निधन झाले. हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गोपिकाबाई मागील आठ वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र अद्यापही घरकुल मंजुर झाले नसल्याने ती आपली मुले व नातावंडासह झोपडीत राहत होती.मात्र तिच्या झोपडीला सुध्दा निसर्गाचा फटका बसला. पावसामुळे झोपडी कोसळल्याने गोपिकाबाईच्या कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. मात्र यानंतरही प्रशासनाला जाग आली नसून ७० वर्षीय वृध्द गोपीकाबाई घरकुलासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. मात्र दगडाच्या प्रशासनाला अद्यापही पाझर फुटलेला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरजू व्यक्तीला घरकुलाचा लाभ दिला जातो.गोपिकाबाई यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेचा यादीमध्ये नाव समाविष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात अंत्यत गरजू लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या कर्मचाºयांनी दिली. केवळ प्रशासकीय दप्तर दिंरगाईमुळे गोपिकाबाईला घरकुल मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ खरोखरच गोरगरीब लाभार्थ्यांना मिळत आहे का यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.दुसऱ्याच्या घराचा आसरापावसामुळे गोपीकाबाईचे राहते घर कोसळल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या घराचा आसरा घेवून राहावे लागत आहे. मात्र याकडे अद्यापही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.गोपिकाबाई यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत ५३ व्या क्रमांकावर होते. नवीन यादीत ९ व्या क्रमांकावर असून ग्रामसेवकांकडून गोपिकाबाईला तत्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. असे पत्र दिले आहे.-निशांत राऊत, ग्रा.पं.सदस्य, कोदामेडी