शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राईस मिलसाठी ‘गुड न्यूज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:35 IST

अडचणीत असलेल्या ग्रामीण भागातील राईस मिल्सना आता २०१ एचपीचे वीज कनेक्शन लघू दाब श्रेणीत समाविष्ट करून दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे२०१ एचपीपर्यंत आता लघू दाब : आमदार अग्रवाल यांची मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अडचणीत असलेल्या ग्रामीण भागातील राईस मिल्सना आता २०१ एचपीचे वीज कनेक्शन लघू दाब श्रेणीत समाविष्ट करून दिले जाणार आहे. यामुळे राईस मिल्सना वीज कनेक्शनसाठी बसत असलेला लाखो रुपयांच्या आर्थिक भुर्दंडापासून सुटका मिळणार आहे.शहरी भागात २०१ एचपीपर्यंत दाब लघु दाब श्रेणीत येत आहे. ग्रामीण भागात मात्र ही सुविधा नाही. राईस मिल चालविण्यासाठी १५० एचपी विद्युत दाब लागत असून ग्रामीण भागात यासाठी उच्च दाब श्रेणीचे कनेक्शन घ्यावे लागते. यासाठी मात्र राईस मिल्सना जोडणी घेण्यासाठी १५-२० लाख रूपयांचा खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ९९ टक्के राईस मिल्स व अन्य उद्योग ग्रामीण भागात असल्याने त्यांना हा फटका सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेत, राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक चंपालाल अग्रवाल व सचिव महेश अग्रवाल (माया) यांनी आमदार अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करून अडचणीतील राईस मिल्स व अन्य उद्योगांना मदत करण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांनी याप्रकरणी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या विषयाला घेऊन कोराडी येथील वीज मंडळाच्या सभागृहात विशेष बैठक घेतली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी सर्व परिस्थिती त्यांच्यापुढे मांडत राईस मिल्सच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न करणे व यात कार्यरत हजारो नागरिकांचा रोजगार वाचविण्यासाठी २०१ एचपीपर्यंत दाब लघु दाब श्रेणीत वाढवून देण्याची मागणी केली. यावर बावनकुळे यांनी, बैठकीत उपस्थित मुख्य अभियंता पारधी व अधीक्षक अभियंता लिलाधर बोरीकर यांना सकारात्मक निर्देश दिले. तसेच ग्रामीण भागात लघु दाबाची क्षमता १०७ पासून २०१ एचपीपर्यंत वाढवून देण्याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अधिकाºयांशी फोनवर चर्चा केली. यासंदर्भात लवकरच आदेश पारित करण्याचे आश्वासन दिले. लघु दाबाची क्षमता आता २०१ एचपी पर्यंत वाढवून दिली जाणार असल्यामुळे राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, माजी अध्यक्ष दामोदर अग्रवाल, अशोक अग्रवाल, गजानंद अग्रवाल, महासचिव महेश अग्रवाल, सहसचिव सुमित भालोटिया, नंदकिशोर अग्रवाल, जुगल खंडेलवाल, निरंजन अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, विष्णू अग्रवाल, किशन खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल