शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका झाला ग्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 11:36 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही सर्वात उशिरापर्यंत कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करून देणारा देवरी तालुका सर्वात प्रथम ग्रीन झाला आहे.

ठळक मुद्देमंगळवारी एकही रूग्ण नाहीआतापर्यंत ५५६ बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही सर्वात उशिरापर्यंत कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करून देणारा देवरी तालुका सर्वात प्रथम ग्रीन झाला आहे. आतापर्यंत ५५६ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आलेल्या देवरी तालुका मंगळवारी (दि.८) एकही  रूग्ण नसल्याची नोंद शासकीय आकडेवारीनुसार करण्यात आली आहे. यामुळे देवरी तालुक्यासाठी गुडन्यूज असतानाच आता तालुका प्रशासनाची जबाबदारी आणखीच वाढली आहे.

कोरोनामुळे देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले व २७ मार्च रोजी गोंदिया शहरातील एक तरूण बाधित आढळला होता. त्यानंतर बराच काळ गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली नव्हती. मात्र तिरोडा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून कोरोना बाधितांनी एंट्री केली व जिल्ह्यातील आकडेवारी झपाट्याने वाढू लागली. सर्वच तालुक्यांत बाधित निघू लागले असतानाच देवरी तालुक्यात सर्वात शेवटी कोरोनाने एंट्री केली होती. त्यानंतर मात्र आतापर्यंत देवरी तालुक्यात ५५६ बाधितांची नोंद घेण्यात आली.

नवरात्रीपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची कधी घट तर वाढ हा प्रकार सुरू आहे. असे असतानाच मात्र सर्वात शेवटी कोरोना बाधित होणारा देवरी तालुका सर्वात अगोदर ‘ग्रीन’ झाला आहे. मंगळवारी (दि.८) कोरोना बाधितांची शासकीय आकडेवारी बघितली असता देवरी तालुक्यात असलेला एकमात्र कोरोना रूग्ण बरा होऊन त्याची सुटी करण्यात आल्याने तालुक्यातील एकही रूग्ण शिल्लक नसल्याची नोंद घेण्यात आली आहे.

तालुका प्रशासनाची जबाबदारी वाढली

राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या देवरी तालुक्यात सर्वात शेवटी कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. एवढेच नव्हे तर आता हाच तालुका सर्वात प्रथम कोरोनामुक्त झाला आहे. यामुळे तालुका प्रशासनाच्या कामगिरीची प्रशंसा करणे गरजेचे आहे. मात्र आता तालुका कोरोनामुक्त झाल्याने तालुका प्रशासनाला आपला तालुका ‘ग्रीन’ ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. यात तालुवासीयांचे सहकार्य अपेक्षीत आहेच.

१० रूग्णांचा कोरोनाने घेतला बळी

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १६८ रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये देवरी तालुक्यातील १० रूग्णांचा समावेश आहे. घरातील कुणाचाही जीव गेल्याने त्या कुटुंबावर काय परिणाम पडतो हे त्याचे त्यांनाच माहिती असते. यामुळे आता तालुकावासीयांनी अधिकच खरबदारीने वागण्याची गरज आहे. कोरोना विषयक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून आपला तालुका ‘ग्रीन’ ठेवणे हे आता तालुकावासीयांच्या हातातच आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या