शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:44 IST

समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचणे प्रगतीशील शासनाचे कर्तव्य आहे. आरोग्य सेवा खरी मानव सेवा आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दासगाव बु. येथे रोगनिदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचणे प्रगतीशील शासनाचे कर्तव्य आहे. आरोग्य सेवा खरी मानव सेवा आहे. मागील वर्षी राज्यातील काँग्रेस शासनाच्या नेतृत्वात आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला व सर्वांच्या सहकार्याने यात आम्ही यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.दासगाव बु. येथे रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना व खमारी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा दर्जा वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यातच गोंदिया तालुक्यातील कासा, तेढवा, कुडवा, सिरपूर, सावरी, महालगाव, मरारटोला, लहीटोला, कटंगटोला आदी गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली.परंतु गोंदिया तालुक्याला विकासाच्या नवीन मार्गापर्यंत पोहोचविणारी सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे. यात विद्यार्थ्यांना कमीतकमी दरात मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल व या ५०० खाटांच्या क्षमतेच्या रूग्णालयात जगात उपलब्ध सर्व प्रकारच्या उपचारांची सोय होईल. त्यामुळे रूग्णांना कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी नागपूर-मुंबई जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी आपल्या भाषणातून, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त मदत मिळावी व ३५ हजार रूपये प्रतिहेक्टर सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी, आ. अग्रवाल यांनी केली असल्याचे सांगितले. या वेळी पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.सदर रोग निदान शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लड प्रेशर, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर मातांची तपासणी व कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रफुल अग्रवाल, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. रूखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर, उपसभापती भक्तवर्ती, जि.प. सदस्य रजनी गौतम, पं.स. सदस्य अनिल मते, आनंद तुरकर, आशीष चव्हाण, रूद्रसेन खांडेकर, लक्ष्मी रहांगडाले, सरपंच कविता मेश्राम, उपसरपंच दिलीप मिश्रा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.