शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन आनेवाले है,ची..प्रतीक्षा

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

सोसल मिडीया असो की, इलेक्ट्रानिक मिडीया असो, प्रत्येक मिडायातून थेट घराघरांतील मतदारांपर्यंंत भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पोहोचले. याची फलश्रुती म्हणजे भाजपला देशात,,,,,

नरेश रहिले - गोंदिया

सोसल मिडीया असो की, इलेक्ट्रानिक मिडीया असो, प्रत्येक मिडायातून थेट घराघरांतील मतदारांपर्यंंत भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पोहोचले. याची फलश्रुती म्हणजे भाजपला देशात स्पष्ट बहुमत मिळाले. अबकी बार मोदी सरकारचा नारा शहरात व ग्रामीण भागातील गल्लीबोळात गुंजला. याच मोदींनी देशवासीयांना अच्छे दिन आनेवाले है.. असे सांगितल्यामुळे आता मतदार आपल्याला चांगले दिवस येतील याकडे आस लावून बसले आहेत.

एनडीएने लोकसभेची २0१४ ची निवडणुक गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ग्रामीण भागातील जनतेला सुखाचे स्वप्न दाखविल्यामुळे देशात भाजपची सरकार आली. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी विकास कामांना खीळ बसविलेल्या नेत्यांना घरी पाठवून भाजपच्या नाना पटोलेंना दीड लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी केले. सतत १0 वर्ष केंद्रीय मंत्रीपद सांभाळणारे मंत्री प्रफुल्ल पटेलांची जादू यावेळी चालली नाही.

देशात मोदींची लहर होतीच मात्र गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले नसतानाही नाना पटोले यांनी लोकांची मने जिंकून लाखो मतांनी विजयी मिळवला. सकाळ पासून मतगणना सुरू होताच गोंदिया जिल्ह्यात व शहरात जल्लोष दिसून येत होता. पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिलेल्या नाना पटोले यांनी दीड लाखापेक्षा अधिक मतानी विजय मिळविला. या विजयामुळे शहराच्या गल्लोगल्लीत हर..मोदी, घरघर..नाना अशी धून गुंजवित भाजपचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक झेंडे घेऊन फिरताना दिसले. शहराच्या गोरेलाल चौकातील ठाटबाट या हॉटेलसमोर ढोल तासे वाजवीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

भाजप कार्यालयासमोरही फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी व गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले हे दोघे सामान्य माणसे यामुळे सामान्य माणसांचा कल यांच्याकडे होता. चहा टपरीवाल्यालाही नमो नमोची जादू भावली अन् प्रत्येकाच्या तोंडावर नमोला पंतप्रधान करायचे आहे, असेच त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होते.

निकाल सुरू असताना नाना पटोले आघाडीवर असल्याची वार्ता कानी पडताच अनेक नागरिकांनी मोदी सरकार व आपला उमेदवार असलेल्या नानाच्या सर्मथनात आपापल्या पध्दतीने आनंद व्यक्त केला. शहरातील अनेक व्यापार्‍यांनी आपल्या दुकानाच्या स्टेच्युला भाजपच्या रंगाचा दुपट्टा घालून दिला. कुणी नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला, कुणी सायकलवर भाजपाचा झेंडा लावून शहरात फेरफटका मारत होता. तर कुणी ढोल तासे वाजवून फटाक्यांची आतसबाजी करीत होता. अबकी बार आई मोदी सरकार.., मोदी को पीएम बनाना है, अच्छे दिन आनेवाले है हे वाक्य जोष भरणार्‍या भीमनगरातील सेवकराम रामटेकर या वृध्दाचे होते. सेवकरामने भाजपच्या कमळाचे चिन्ह असलेली टी-शर्ट परिधान करून दोन हातात दोन भाजपचे झेंडे घेऊन शहरात दिवसभर त्याने ‘अच्छे दिन आनेवाले है’चा पाढा गाईला.

मोदी सरकार स्थापन होत असल्याने गोंदिया/भंडारा लोकसभा क्षेत्रातील मतदारांना चांगल्या दिवसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.