शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात झाली चेहऱ्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:15 IST

अपघातात चेहºयावरील बहुतांश हाडे तुटल्याने त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या चेहºयाची शस्त्रक्रिया गोंदियात होत नव्हती. अश्या परिस्थितीत गोंदियातील रूग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत होते. परंतु येथील ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिंद्र जांभूळकर यांच्या पुढाकाराने ही शस्त्रक्रिया गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातच करण्यात आली.

ठळक मुद्देआता नागपूरला जाण्याची गरज नाही : पैशाची झाली बचत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अपघातात चेहऱ्यावरील बहुतांश हाडे तुटल्याने त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या चेहऱ्यांची शस्त्रक्रिया गोंदियात होत नव्हती. अश्या परिस्थितीत गोंदियातील रूग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत होते. परंतु येथील ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिंद्र जांभूळकर यांच्या पुढाकाराने ही शस्त्रक्रिया गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातच करण्यात आली. गोरेगाव तालुक्यातील एका व्यक्तीचा गंभीर अपघात झाल्याने त्याच्या तोंडाची हाडे मोठ्या प्रमाणात तुटलेली होती. त्या रूग्णाला शस्त्रक्रियेसाठी नागपूरला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.चेहऱ्याची शस्त्रक्रिया यापूर्वी गोंदियात कधीच झाली नव्हती. परंतु महात्मा जोेतिबा फुले जन आरोग्य योजनेतून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्या रूग्णांच्या चेहऱ्यावर दुर्र्मिळ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गोंदियात मागील दीड वर्षापासून रुजू झालेले ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिंद्र जांभूळकर यांनी गंभीर रूग्णांना हाताळणे सुरू केले. सोमवारी (दि.२५) रोजी सकाळी १० ते १२.३० या अडीच तास त्या रूग्णाच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रूग्णाच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तुटलेल्या हाडांना इंजेक्शन लावण्यासाठी बधिरीकरण तज्ज्ञांची भुमिका महत्वाची असते. भूलतजज्ञ डॉ. सुगंध व डॉ. हेमंत देशमुख यांनी या शस्त्रक्रियेसाठी यांनी महत्वाची भुमिका बजावून सहकार्य केले. यापूर्वी अशा रूग्णांना नागपूरलाच रेफर केले जात होते. परंतु डॉ.मनिंद्र जांभूळकर यांच्या पुढाकाराने आता गोंदियातच या रूग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. वैद्यकीय अधिष्ठाता पी.व्ही.रूखमोडे यांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मदतचेहऱ्यावर दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मदत देण्यात आली. केटीएस मधील आरोग्य मित्र डॉ. स्मीता भरणे यांच्या प्रयत्नाने या रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया गोंदियातच पहिल्यांदा करण्यात आली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर