शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात केकेडी दलम सदस्य जगदीशचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 10:55 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विभागांतर्गत गोंदिया-राजनांदगाव-बालाघाट येथे कार्यरत नक्षलवाद्यांच्या केकेडी दलम सदस्य जगदीश उर्फ महेश उर्फ विजय अगनू गावडे (२७) याने आत्मसमर्पण केले.

ठळक मुद्देहिंसक कारवायांत सहभाग पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विभागांतर्गत गोंदिया-राजनांदगाव-बालाघाट येथे कार्यरत नक्षलवाद्यांच्या केकेडी दलम सदस्य जगदीश उर्फ महेश उर्फ विजय अगनू गावडे (२७) याने आत्मसमर्पण केले. पोलीस अधीक्षक विनीता साहू व अतिरीक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी याची सोमवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत माहिती दिली.जगदीशवर सहा हिंसक घटनांत सहभागी असल्याचा आरोप आहे. यात छत्तीसगड राज्यातील भावे गावाजवळ झालेल्या चकमकीमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. जून २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील फुलगोंदी, आॅक्टोबरमध्ये लेकुरबोडी तसेच कैमुल येथील हिंसक घटनेतही तो सहभागी होता. कैमुल येथील फायरिंगमध्ये तो जखमी झाला होता. तर चार महिला नक्षलींना पोलिसांनी पकडले होते. सन २०१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील टिप्पागड फायरिंगमध्येही तो सहभागी होता. बालाघाट जिल्ह्यातील बगरझोलामध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या चकमकीमध्ये त्याचा समावेश होता.या घटनेत एक नक्षलवादी ठार तर दोघे जखमी झाले होते. सन २०१२ मध्ये नक्षल आंदोलनात सहभागी झालेला जगदीश सुरूवातीला कोरची दलममध्ये सक्रीय होता. त्याचे काम बधून त्याला माओवादींच्या केंद्रीय कमिटी सदस्य मिलींद तेलतुंबडे याने स्वत:च्या सुरक्षेसाठी नियुक्त केले होते. सद्यस्थितीत तो विस्तार पीएल-३ सदस्य म्हणून कार्यरत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्याच्या पुनर्वसनाचे प्रयत्न केले जाईल. राज्य शासनाकडून आत्मसमर्पण करणाºया नक्षलवाद्यांना अडीच लाख रूपये रोख दिले जातात. केंद्र शासनाकडून त्वरीत मदत म्हणून अडीच लाख रूपये दिले जातात. अशाप्रकारे पाच लाख रूपये तसेच शिक्षण, रोजगार-स्वयंरोजगारासाठी कर्ज, भूखंडासाठी आर्थिक मदत दिली जाईल.

२२ तरूणांना बनविले नक्षलवादीजगदीशने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगीतले की, तो सन २०१२ मध्ये नक्षली चळवळीशी जुळला. तो आपल्या बहिणीकडे जात होता. यादरम्यान काही जणांसोबत त्याची ओळख झाली व त्यांच्यात काय होते हे जाणून घेण्याची जिज्ञासा वाढली. गावात नक्षलवादी सभेसाठी आले असता त्यांच्यासोबत तो निघून गेला. १५ दिवस त्यांच्यासोबत राहून परत येण्याची मागणी केली असता त्याला भिती दाखवून थांबवून घेण्यात आले.या दरम्यान त्याने २२ तरूणांना नक्षल आंदोलनात जोडले. त्यांच्याशी बोलणे झाल्यास तो त्या तरूणांनाही देशाच्या मुख्य धारेशी जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगीतले. सध्या ते सर्व बोडला दलममध्ये कार्यरत आहेत. नक्षलवाद्यांकडे पोलिसांकडून हिसकाविलेले शस्त्र असल्याचे त्याने सांगीतले.सध्या कोरची दलममध्ये १० सदस्य असून त्यात तीन महिला असल्याची माहिती त्याने दिली.पोलिसांच्या सुरक्षेत देवरी येथे राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्याचे तीन भाऊ, बहीण व आई असून सन २०१२ नंतर त्यांच्याशी आतापर्यंत भेट झालेली नाही. नक्षलवादी म्हणून पळापळ करण्यात आता तो थकला.अशात स्वत:चे भविष्य अंधारात पाहून आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगीतले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी