शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाची तेजश्री जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: May 28, 2015 01:20 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

९३.९४ टक्के निकाल : विज्ञान शाखेतून हरेंद्रजित अरोरा प्रथम तर मीत हरिणखेडे द्वितीयगोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गोंदियातील विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची तेजश्री बालपांडे हिने ९६.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यापाठोपाठ प्रोग्रेसिव्ह कनिष्ठ महाविद्यालयाचा हरेंद्रजित कलवंतसिंग अरोरा याने ९६.१५ टक्के गुण घेत दुसरा तर महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाची मीत हरिणखेडे हिने ९५.२३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ५८२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. ५९१६ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे. कला शाखेतून ९१.६५ टक्के विद्यार्थी, वाणिज्य शाखेतूून ९०.६८ टक्के आणि व्होकेशनलमधून ८६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३० मुले व ९ हजार ६९० मुलींनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८२३ मुले आणि ९ हजार २३३ मुली उत्तीर्ण झाल्या. यावर्षीही पुन्हा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते. त्यामुळे निकालात मुलांपेक्षा मुलीच श्रेष्ठ ठरल्या आहेत.विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा चार शाखांमधून १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८ हजार ४३१ विद्यार्थी विज्ञान शाखेचे, ९ हजार ४३० विद्यार्थी कला शाखेचे, ८९१ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे तर ४६८ विद्यार्थी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे होते. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या , अर्थात १०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यात २५ शाळा आहेत. गेल्यावर्षी २१ शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के होता. त्यात शहरीपेक्षा ग्रामीण भागातील शाळांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. देवरी तालुक्यात हा फरक सर्वात जास्त आहे. तिथे ८७.५२ टक्के मुले आणि ९३.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी ९२.५८ टक्के मुले अणि ९५.२८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)आजी-आजोबांच्या पाठबळातून मिळविले तेजश्रीने यशतेजश्री ही तशी भंडारा जिल्ह्यातील तुमसरची. तिचे आई-वडिल तिथेच राहतात. एका प्रतिष्ठानात खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या वडिलांपेक्षा तेजश्रीवर तिच्या आजी-आजोबांचेच (आईचे बाबा) संस्कार जास्त आहेत. नगर परिषदेतून सेवानिवृत्त झालेले आजोबा नरेंद्र आगाशे यांच्यासह आई व तिच्या मावशीने तिला आई-वडिलांप्रमाणे प्रेम देऊन मानसिक पाठबळ दिले. अगदी ती दीड वर्षाची असतानापासूनच तेजश्री आजी-आजोबांसोबत गोंदियात राहते. तल्लख बुद्धिमत्तेसह, जिद्द आणि चिकाटी ठेवून तिने दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळीही तिने ९७ टक्के गुणांचे लक्ष्य निर्धारित करीत ९६.६१ टक्के गुण पटकावले. तिच्या या यशात मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.रायकवार यांचे वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनाचाही वाटा असल्याचे तिने सांगतिले. स्वअध्ययनावर जोर देत टार्गेट बेस अभ्यास करून आपण हे यश मिळविल्याचे ती सांगते. देशातील ‘टॉप टेन’ कॉमर्स कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून बी.कॉ., एम.बी.ए. करणार, तिथे प्रवेश न मिळाल्यास कोणत्याही कॉलेजमधून बी.कॉम. करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असल्याचे तेजश्रीने सांगितले.गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गोंदियातील विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची तेजश्री बालपांडे हिने ९६.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यापाठोपाठ प्रोग्रेसिव्ह कनिष्ठ महाविद्यालयाचा हरेंद्रजित कलवंतसिंग अरोरा याने ९६.१५ टक्के गुण घेत दुसरा तर महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयाची मीत हरिणखेडे हिने ९५.२३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ५८२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. ५९१६ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे. कला शाखेतून ९१.६५ टक्के विद्यार्थी, वाणिज्य शाखेतूून ९०.६८ टक्के आणि व्होकेशनलमधून ८६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात एकूण ९ हजार ५३० मुले व ९ हजार ६९० मुलींनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८२३ मुले आणि ९ हजार २३३ मुली उत्तीर्ण झाल्या. यावर्षीही पुन्हा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते. त्यामुळे निकालात मुलांपेक्षा मुलीच श्रेष्ठ ठरल्या आहेत.विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा चार शाखांमधून १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८ हजार ४३१ विद्यार्थी विज्ञान शाखेचे, ९ हजार ४३० विद्यार्थी कला शाखेचे, ८९१ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे तर ४६८ विद्यार्थी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे होते. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या , अर्थात १०० टक्के निकाल देणाऱ्या जिल्ह्यात २५ शाळा आहेत. गेल्यावर्षी २१ शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के होता. त्यात शहरीपेक्षा ग्रामीण भागातील शाळांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. देवरी तालुक्यात हा फरक सर्वात जास्त आहे. तिथे ८७.५२ टक्के मुले आणि ९३.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी ९२.५८ टक्के मुले अणि ९५.२८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)१) शांताबेन मनोहरभाई पटेल ज्यु. कॉलेज, गोंदिया२) विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया३) मनोहरभाई पटेल सैनिकी शाळा गोंदिया४) प्रोग्रेसिव्ह हायस्कूल क.महाविद्यालय गोंदिया५) फुंडे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फुचलूर६) संजय जयरामदास क.महाविद्यालय ठाणा७) मिलिंद कला कनिष्ठ महाविद्यालय बाकटी ता.अर्जुनी मोर.८) श्रीमती भगिरथीबाई डोंगरवार क.महाविद्यालय नवेगावबांध९) जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालय गौरनगर१०) आदिवासी विकास क.महाविद्यालय झासीनगर, ता.अर्जुनी मोर.११) श्री सम्राट आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, अर्जुनी मोर१२) शासकीय मुलींची आश्रमशाळा बोरगाव (बाजार)१३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर क.महाविद्यालय डोंगरगाव ता.देवरी१४) प्रिदर्शिनी कला महाविद्यालय घुमर्रा१५) किनसान मिशन कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव१६) लोकसेवा क.महाविद्यालय, कोसमतोंडी१७) स्व.बनारसीदास अग्रवाल क.महाविद्याल, सडक अर्जुनी१८) पार्थ कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी१९) स्व.हिरालाल जैन कनिष्ठ महाविद्यालय खोबा, ता.सडक अर्जुनी२०) लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय कोकणा-जमी२१) जीईएस कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सडक-अर्जुनी२२) शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय बिजेपार२३) शहीद अवंती कनिष्ठ महाविद्यालय कोटजंभुरा, ता.सालेकसा२४) लालसिंह मच्छीरके कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध२५) एस.एन. विज्ञान महाविद्यालय सरांडी