शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अमृत शहर योजनेत गोंदियाला १६ वे रॅकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:08 IST

राज्य सरकारने १ लाख लोकसंख्येवरील शहरांचा समावेश अमृत शहर योजनेत केला. या शहरांमध्ये शुध्द पाणी, स्वच्छता आणि इतर दर्जेदार सुविधा देणाºया नगर परिषद आणि महानगरपालिकांना रॅकिंग दिले. यात गोंदिया शहराला १६ वे रॅकिंग प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्दे११०० नागरिकांनी डाऊनलोड केले स्वच्छता अ‍ॅप : केंद्राची चमू करणार निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने १ लाख लोकसंख्येवरील शहरांचा समावेश अमृत शहर योजनेत केला. या शहरांमध्ये शुध्द पाणी, स्वच्छता आणि इतर दर्जेदार सुविधा देणाºया नगर परिषद आणि महानगरपालिकांना रॅकिंग दिले. यात गोंदिया शहराला १६ वे रॅकिंग प्राप्त झाले आहे.गोंदिया शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ लाख ३२ हजार ८१३ आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने १ लाख लोकसंख्येवरील शहरात शुध्द पाण्याची व्यवस्था,पाणी पुरवठ्याच्या सोयी आणि स्वच्छता व्यवस्थेत सुधारण्यासाठी अमृत शहर योजना सुरू केली. या सर्व सुविधांचे निरीक्षण करुन त्या शहरांना रॅकिंग दिले जात आहे.नगर विकास विभागाचे राज्यातील विविध महानगर पालिका आणि नगर परिषदेची रॅकिंगची यादी नुकतीच जाहीर केली. यात गोंदिया शहराला १६ रॅकिंग मिळाले. त्यामुळे गोंदिया शहराला पाणी पुरवठा योजना व स्वच्छतेकरिता अतिरिक्त निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षणाला २०१८ सुरूवात केली आहे. यातंर्गत काही दिवसात केंद्र सरकारची एक चमू शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृत करण्यासाठी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याची मोहीम सुरू केली होती. यातंर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करणाºया नागरिकांच्या संख्येवरुन रॅकिंग देण्यात आले.यात गोंदिया नगर परिषदेला मंगळवारी (दि.२) ११३ वे रॅकिंग जाहीर करण्यात आले. एकूण लोकसंख्येच्या दीडपट लोकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. नगर परिषद कर्मचाºयांनी मागील काही दिवसांपासून स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याची मोहीम सुरू केली आहे.आतापर्यंत शहरातील ११७३ नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. याच आधारावर शहराला यामध्ये ११३ वे रॅकिंग मिळाले आहे. नगर परिषदेने शहरात स्वच्छता विषयक मोहीम राबविण्यासाठी आत्तापर्यंत कोणत्या उपाय योजना केल्या याची माहिती नगर विकास मंत्रालयाने मागविली होती.त्या आधारावर नगर परिषदेला १६३० पैकी ११८९ गुण प्राप्त झाले आहे. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नगर परिषदेला ४ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहे. या तक्रारींचे निवारण करण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे.