शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाकरांना पुणेरी मूर्त्यांची भुरळ

By admin | Updated: August 30, 2014 01:50 IST

गणरायाचे रूप बघावे तेवढे कमीच. त्यामुळेच प्रत्येक मुर्तीकार आपल्या कल्पकतेतून गणरायाची मूर्ती साकारतात. यावर्षी मात्र गोंदियाकरांना पुणेरी मुर्त्यांनी भुरळ घातल्याचे दिसून आले.

कपिल केकत गोंदियागणरायाचे रूप बघावे तेवढे कमीच. त्यामुळेच प्रत्येक मुर्तीकार आपल्या कल्पकतेतून गणरायाची मूर्ती साकारतात. यावर्षी मात्र गोंदियाकरांना पुणेरी मुर्त्यांनी भुरळ घातल्याचे दिसून आले. येथील दोघा तरूण व्यापाऱ्यांनी थेट पुण्याहून गणपतीच्या मूर्ती मागविल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडील मुर्त्या हातोहात खपल्या असून यातूनच गोंदियाकरांमध्ये पुणेरी मुर्त्यांचे आकर्षण असल्याचे दिसून आले.गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची ख्याती बघता लगतच्या परिसरासह छत्तीसगड राज्यातील मुर्तीकार यंदा गोंदियात आपली कला सादर करण्यासाठी आले आहेत. गणरायाचे नानाविध रूप असल्याने प्रत्येक मुर्तीकार अधिकाधिक आकर्षक मुर्ती साकारण्यासाठी जिवाचे रान करतो. वेगवेगळ््या आकर्षक मुर्त्यांमुळेच गोंदियातला उत्सव भव्य-दिव्य होऊन त्याची ख्याती पसरतच चालली आहे. असे असतानाही, पुणेरी मुर्त्यांची बनावट व त्यांचे आकर्षण काही औरच असते. पाहताक्षणी मनाला मोहून टाकणारा गणरायाचा देखणा चेहरा ही पुणेरी मुर्त्यांची खासीयत आहे. यामुळेच येथील दोघे तरूण थेट दौंड (पुणे) येथून गणरायाच्या मुर्त्या घेऊन आले आहेत. कार्तिक माटे व चेतन कुरील (रा.कृष्णपुरा वॉर्ड) अशी या तरूणांची नावे आहेत. पुणेरी मुर्त्यांची विक्री करण्याचे हे त्यांचे नववे वर्ष असले तरी यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.दौंड येथे मामाच्या घरी गेलो असता तेथील मुर्त्या बघून गोंदियात यांची विक्री करण्याचे डोक्यात आले. त्यावर्षी मोजक्याच मुर्त्या आणल्या होत्या, पण गोंदियाकर आकर्षित झाल्याने सर्व मुर्त्या विकल्या गेल्या. त्यानंतर ग्राहक बांधले गेलेत तर त्यांच्याकडील मुर्ती बघून नवे ग्राहक तयार झाले. यावर्षी या तरूणांनी येथून ट्रक नेला व तेथून २५० मुर्त्या विक्रीसाठी आणल्या. येथील नेहरू चौकात या दोघा तरूणांनी आपले ठाण मांडले होते.या तरूणांकडे १५० रूपयांपासून ते ५००१ रूपयांपर्यंतची मुर्ती उपलब्ध होती. मात्र गोरेगाव येथील मंडळाने त्यांच्याकडील पाच हजार रूपयांची लालबागच्या राजाची प्रतीकात्मक मुर्ती खरेदी करून नेल्याचे त्यांनी सांगितले. आणलेल्या सर्व मुर्त्या विकल्या गेल्या. आतापर्यंत छत्तीसगडी मूर्त्यांचे आकर्षण असलेल्या गोंदियाकरांना आता पुणेरी मुर्त्या आकर्षीत करीत असल्याचे दिसले.