शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतर गोंदिया झाला ‘कूल-कूल’, पारा घसरून ३५.५ अंशावर : ढगा‌ळ वातावरणाने दिलासा 

By कपिल केकत | Updated: April 23, 2023 19:10 IST

गुरूवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली व शुक्रवारी वातावरणात गारवा असल्याने ४३ अंशावर गेलेला पार घसरून ४१ अंशावर आला होता.

गोंदिया : शनिवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हयाचा पार आणखी घसरला असून रविवारी (दि.२३) कमाल तापमान ३५.५ अंशावर आले होते. त्यातही दिवसा पाऊस बरसला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला. मात्र दिवसा उन्ह तापल्याने पावसाची आठवण येत होती. 

गुरूवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली व शुक्रवारी वातावरणात गारवा असल्याने ४३ अंशावर गेलेला पार घसरून ४१ अंशावर आला होता.नंतर पारा आणखी घसरला व शनिवारी तापमान ३९.५ अंश होते. मात्र विदर्भात गोंदिया जिल्हयाचे तापमान सर्वाधिक असल्याने जिल्हाच ‘हॉट’ होता. अशात शनिवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली व त्यामुळे परत एकदा वातावरणात गारवा  निर्माण झाला. यानंतर रविवारी (दि.२३) जिल्हयाचे तापमान आणखीच घसरले व ३५.५ अंश सेल्सीअसवर आले होते. त्यातही कढी ढग तर कधी उन्ह अशा वातावरणाने दिलासा मिळाला. 

चंद्रपूर परत एकदा अग्रस्थानी 

- विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असते व चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी असतो.  मात्र शनिवारी त्याची जागा गोंदिया जिल्ह्याने घेतली होती.  असे असतानाच रविवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान वधारून ३८.२ अंशावर गेले व चंद्रपूर जिल्हा परत एकदा सर्वात गरम ठरला. तर नागपूर जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी ३५.३ अंशावर होते व नागपूर  ‘कूल’ तर गोंदिया जिल्हा ‘सेकंड कूल’ होता. 

मंगळवारी गारपीटीचा इशारा

- हवामान खात्याने बुधवारपर्यंत (दि.२६) जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. अशात मात्र आता मंगळवारी (दि.२५) गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हयातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरात शनिवारीच गारपीट झाली आहे. त्यानंतर आता परत गारपीटीचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.