शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

रोहयोच्या कामात विभागात गोंदिया पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 01:55 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नागपुर विभागात गोंदिया जिल्हा माघारला आहे.

चंद्रपूर आघाडीवर : जिल्ह्यातील ५१.९६ टक्के काम अपूर्णगोंदिया : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नागपुर विभागात गोंदिया जिल्हा माघारला आहे. गोंदिया जिल्ह्याची स्थिती या योजनेप्रती यावर्षी दयनिय आहे. जिल्ह्यात मनेरगा अंतर्गत करण्यात येणारे ५१.९६ टक्के काम अपूर्ण आहेत. या शिवाय चंद्रपुर जिल्ह्यात या योजनेतील कामांना उदंड प्रतिसाद असून तेथील फक्त २९.३३ टक्के काम अपूर्ण आहेत.मनरेगा अंतर्गत सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये गोंदिया जिल्ह्यात २४ हजार ८७९ काम सुरू झाले. यातील ११ हजार ९५२ म्हणजे ४८.०४ टक्के कामे सुरू झाली असून १२ हजार ९२७ कामे म्हणजेच ५१.९६ टक्के कामे अपूर्ण आहेत. मनरेगाच्या कामात आघाडीवर असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात मागील तीन वर्षात २५ हजार ७४७ कामे सुरू झाली असून १८ हजार १३६ कामे म्हणजेच ७०.६७ टक्के काम पुर्णत्वास गेली आहेत. तर ७ हजार ५५१ म्हणजेच २९.३३ कामे अपुर्ण आहेत. गोंदिया नंतर गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३२ हजार ८१४ कामे सुरू झाली असून त्यात १५ हजार ९५८ म्हणजेच ४८.६३ टक्के कामे पूर्ण आहेत. तर १६ हजार ८५६ म्हणजेच ५१.३७ टक्के कामे अपूर्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात सुरू झालेल्या २९ हजार २३३ कामांपैकी १८ हजार ६०६ म्हणजेच ६३.६५ कामे पुर्ण झाली आहेत. तर १० हजार ६२७ म्हणजेच ३६.३५ टक्के कामे अपुर्ण आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यात २६ हजार २७८ कामे सुरू असून यातील १६ हजार ९८४ म्हणजेच ६४.६३ टक्के कामे पुर्ण झाली आहेत. तर ९ हजार २९४ कामे म्हणजेच ३५.६३ टक्के कामे अपुर्ण आहेत. वर्धा जिल्ह्यात ४६ हजार ३३१ कामे सुरू असून ३० हजार ४३५ म्हणजेच ६५.६९ कामे पुर्ण झाले आहेत. तर १५ हजार ८९६ म्हणजेच ३४.३१ टक्के कामे अपुर्ण आहेत. (तालुका प्रतिनिधी)